Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वाध्वी प्रज्ञा सिंह यांच्या उमेदवारीवर स्वरा भास्करची जोरदार टीका

webdunia
, शुक्रवार, 19 एप्रिल 2019 (16:32 IST)
भाजपाने भोपाळमधून साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे. भोपाळमध्ये दिग्विजय सिंह विरुद्ध साध्वी प्रज्ञा असे विरोधी उभे राहिले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटात आरोपी राहिलेल्या साध्वी यांना उमेदवारी दिल्याबद्दल अनेकांकडून जोरदार टीका होत आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री स्वरा भास्करनेही जोरदार टीका केली आहे. ‘लोकसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांच्या यादीत आणखी एका नावाची भर. संभाव्य दहशतवादी, मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा. द्वेष आणि विभाजनाच्या अजेंड्याबाबत भाजपा अत्यंत नग्न आहे,’ अशा शब्दांत स्वराने भाजपावर प्रहार केला आहे. ट्विटवर शिवसेना नेत्याने आक्षेप घेत तिला ‘कन्हैय्याची आई’ असं म्हटलं. ‘भारत तेरे तुकडे वाला चालतो पण एक निर्दोष महिला नाही चालत. स्वरा अजून किती खालच्या स्तरावर जाणार, ही तर हद्द झाली,’ अशी टीका त्याने केली. स्वराने कन्हैय्या कुमार यांना पाठिंबा देत त्यांच्यासाठी प्रचारसुद्धा केला होता. यावरही स्वराने प्रत्युत्तर देत ट्विट केलं, ‘चाचाजी, मी कितीही खालच्या पातळीवर गेली तरी तुम्ही आणि तुमच्या संघवाद्यांच्या पातळीपर्यंत कधीच पोहोचू शकणार नाही. ही महिला तुम्हाला निर्दोष वाटते- वाह! मग तर तुम्हाला हाफिज सईद संत वाटत असेल? माफ करा, तो तर मुस्लीम आहे.’ अशी जोरदार सोशल मिडीया वॉर सध्या सुरु आहे. त्यात साध्वी प्रज्ञा या बेताल वक्तव्य करून अजून टीकेच्या धनी होत आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जवानाच्या पत्नीने दोन लहान मुलांसह केली आत्महत्या