Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चां

आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चां
, सोमवार, 15 एप्रिल 2019 (09:06 IST)
महाराष्ट्राच आणि देशाच लक्ष सध्या  सोलापूर लोकसभा मतदारसंघाकडे आहे. या ठिकाणी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे काँग्रेसकडून, तर प्रकाश आंबेडकर वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवत आहेत. सोबतच भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य उमेदवार आहेत. ही तिरंगी लढत चुरशीची  होणार आहे. त्यात प्रकाश आंबेडकर आणि भाजपा उमेदवार जयसिद्धेश्वर शिवाचार्य यांचे पारडे जड आहे अशी सोलापुरात चर्चा आहे. मात्र अचानक एक फोटो सोशल मिडीयावर ससमोर आला असून, कॉंग्रेस उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याचा फोटो आहे. त्यांच्या या फोटो मुळे राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु झाली आहे. या भेटीवर प्रकाश आंबेडकर यांनी आपले मत व्यक्त केले आहे. आंबेडकर म्हणाले की काँग्रेस हा गाढवांचा पक्ष असून, भेटीचे राजकारण करणं हे काँग्रेसवाल्यांना नेहमीच जमतं आले आहे. निवडणूक आहे म्हणून वैर असं मी कधीच मानलं नाही. कुणाला तरी भेटायचे आणि फोटो व्हायरल करायचे, हे काँग्रेसचे जुने डावपेच आहेत. सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना जोरदार सुरु झाली आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भाजपा कार्यालय उद्घाटन भाजपा कार्यकर्त्यांमध्ये वाद