Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

politics
, शनिवार, 13 एप्रिल 2019 (17:31 IST)
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. 
 
सुशीलकुमार शिंदे हे शिवराज पाटील चाकूरकर यांना भेटण्यासाठी गेल्यानंतर, प्रकाश आंबेडकर यांची भेट झाल्याचा दावा काँग्रेसने केला आहे. मात्र आंबेडकर आणि सुशीलकुमार शिंदे यांच्या भेटीने सोलापूर शहरात राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. सोलापूर लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीकडून प्रकाश आंबेडकर, काँग्रेसकडून सुशीलकुमार शिंदे आणि भाजपकडून जयसिद्धेश्वर शिवाचार्य हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुंबईत निमविषारी साप सापडला