Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

रायगड २६ उमेदवार यामध्ये चार अनंत गीते, तीन सुनील तटकरे लोकसभा निवडणुकीत

रायगड २६ उमेदवार यामध्ये चार अनंत गीते, तीन सुनील तटकरे लोकसभा निवडणुकीत
, शुक्रवार, 5 एप्रिल 2019 (08:03 IST)
रायगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवशी १४ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्रे दाखल केली. या मतदार संघात आता एकूण अर्ज भरलेल्या उमेदवारांची संख्या २६ झाली आहे. 
 
शिवसेना-भाजप युतीचे अधिकृत उमेदवार विद्यमान खासदार व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या विरोधकांनी त्यांच्या नावाशी साधर्म्य असणाऱ्या ‘अनंत पद्मा गीते’ यांचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. युतीचे अधिकृत उमेदवार अनंत गीते यांच्या सूचकांनी अनंत गंगाराम गीते (शिवसेना) यांचे आणखी दोन उमेदवारी अर्ज दाखल केले असून, आगाडीचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडीचे अधिकृत उमेदवार सुनील दत्तात्रेय तटकरे यांच्याशी नामसाधर्म्य असणारे सुनील सखाराम तटकरे आणि सुनील पांडुरंग तटकरे या दोघांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेत. 
 
शेवटच्या दिवशी सुभाष जनार्दन पाटील (अपक्ष), संजय अर्जुन घाग (अपक्ष), विलास गजानन सावंत (महाराष्ट्र क्रांती सेना), सचिन भास्कर कोळी (वंचित बहुजन आघाडी), गजेंद्र परशुराम तुरबाडकर (क्रांतिकारी जयहिंद सेना), प्रकाश सखाराम कळके (भारतीय किसान पार्टी), अविनाश वसंत पाटील (अपक्ष), रामदास दामोदर कदम (अपक्ष), अख्तरी जैनुद्दीन चौधरी (अपक्ष), योगेश दीपक कदम (अपक्ष), गायकवाड अनिल बबन (अपक्ष), मुजफ्फर जैनुद्दीन चौधरी (अपक्ष) यांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार सुमन भास्कर कोळी यांनी आणखी एक अर्ज दाखल केला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कुत्र्याच्या पिल्लांला अमानुष मारहाण घटना सीसीटीव्हीत कैद, गुन्हा दाखल