ठाण्यात आंबा स्टॉलवरून मनसे आणि भाजपा यांच्यात झालेल्या राड्याबाबत राज ठाकरेंना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, राज ठाकरे म्हटले की ठाण्यात मनसैनिकांनी चोपून आंबा खाल्ला. अक्षय कुमारने पंतप्रधान नरेंद्र मोदींची मुलाखत घेतली त्यात विचारलं होतं की मोदीजी तुम्ही आंबा कापून खाता की चोखून? हे तुम्हाला माहित आहे ना? यावर पत्रकार हो म्हणताच ठाण्यात मनसैनिकांनी चोपून आंबा खाल्ला अशी प्रतिक्रिया राज ठाकरेंनी दिली.
याआधी ठाण्यात ९ मे रोजी मनसेने त्यांच्या कार्यालयाबाहेर आंबा विक्रीसाठी स्टॉल लावला होता. हा स्टॉल अनधिकृत असल्याचं सांगत भाजपाने तो स्टॉल हटवण्याचा प्रयत्न केला. ज्यानंतर मनसे आणि भाजपाचे कार्यकर्ते भिडले होते.