Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देवेंद्र फडणवीस यांची आघाडी, राज ठाकरे, भुजबळ यांच्यावर जोरदार टीका

देवेंद्र फडणवीस यांची आघाडी, राज ठाकरे, भुजबळ यांच्यावर जोरदार टीका
, शनिवार, 27 एप्रिल 2019 (16:44 IST)
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकमधील सभेत कोन्ग्रेस आघाडी सोबत  मनसे अध्यक्ष राज ठाकरे, छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली आहे. नाशिकच्या जनतेने राज ठाकरेंना मनपाची सत्ता दिली होती, मात्र त्यांनी एकही कामं केली नाही. कुंभमेळ्यात युती सरकारने कामं केली आहेत. मात्र राज ठाकरे केवळ फुकटचं श्रेय घेत आहेत घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे. प्रथम तीन टप्प्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचा सुपडा साफ झाला असून, कर्णधार पवारांनी पॅड घातलं, ग्लोव्ह्ज घातले मात्र मोदींची गुगली पाहून पॅव्हिलियनमध्ये परत निघून गेले आहेत. तर पवारांनी निवडणुकीत भाड्याने वक्ते आणावे लागले आहेत. शरद पवार साहेबांनी रेल्वेचं इंजिन भाड्याने घेतल असून, मात्र फक्त तोंडाच्या वाफेने इंजिन चालत नाही, ते तर आता गल्लीत बंद पडलं असून, या इंजिनला फक्त मोदींनी पछाडलं आहे. 
 
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की राज साहेब तुमचं दुकान नोटबंदीने बंद झालं आहे. आमची कुठेही शाखा नाही अशी यांची परिस्थिती तुमची झाली असून, नाशिकच्या जनतेनं तुम्हाला घरी पाठवलं असून नाशिकच्या विकासाची कामं आमच्या पैशांनी झाली आहेत. राज तुम्ही तुमचे नगरसेवक आणले होते असे म्हणाले होता, महापालिकेचा हिस्सा सिंहस्थाला देऊ शकत नाही. आमच्या पैशाने शहरात कुंभात विकासाची कामं केली. तुमचं नेमकं कर्तृत्व काय असा आमचा सवाल आहे, अशी घणाघाती टीका मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. आता तिसरया टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार असून आज या टप्प्यातील प्रचार पूर्ण थांबणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

20 रुपयांची हिरव्या-पिवळ्या रंगाची नवी नोट लवकरच चलनामध्ये