Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शरद पोंक्षे यांच्याकडून कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध

शरद पोंक्षे यांच्याकडून कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध
, बुधवार, 15 मे 2019 (17:13 IST)
अभिनेते कमल हसन यांनी एका सभेदरम्यान स्वतंत्र भारतातील पहिला दहशतवादी हिंदू होता आणि त्याचे नाव नथुराम गोडसे होते, असे वक्तव्य केले. या पार्श्वभूमीवर अभिनेते शरद पोंक्षे यांनी फेसबुवर पोस्ट करत कमल हसन यांच्या वक्तव्याचा निषेध केला. त्यांनी असे लिहिले आहे की, "दहशतवादाला धर्म नसतो".

अगदीच मान्य, पण पकडलेला दहशतवादी हा मुस्लिम असतो हे जगातील वास्तव. हिंदू धर्म हा मुळातच सहिष्णूवादी. इतिहास साक्ष आहे की हिंदूनी कधीही दहशतवादी कारवाया केल्या नाहीत. आक्रमणे केली नाहीत. आम्ही प्रत्येक मुसलमानाकडे दहशतवादी म्हणून बघतच नाही. म्हणूनच जगात मुसलमान सर्वात सुरक्षित व सुखी कूठे रहात असतील तर ते हिन्दूस्थानात आणि हे कित्येक मुसलमानांच मत आहे. पण तरीही एक अभिनेता केवळ राजकीय स्वार्थासाठी हिंदू दहशतवादी असा ऊल्लेख करतोय तेही जाहीरपणे. आणि आपण ते खपवून घेतो. हाच हिंदूंचा सहिष्णूपणा. असे मत पोंक्षे यांनी फेसबुद्वारे मांडत ते पुढे म्हणाले आहेत की, 
 
आता नथूराम गोडसे ह्याने गांधीचा खून केला. ह्यावर चूक बरोबर ह्यावर लाखो मत मांडली गेली. चर्चा झाल्या. पण म्हणून सरसकट हिंदूनाच दहशतवादी ठरवल जातय. हे वक्तव्य करणाऱ्या कमल हसन यांचा मी तीव्र निषेध करतो. आपल्याला पटल तर तूम्ही ही करा. असा जनतेला संदेश देत. हा कोणा पक्षाचा अपमान नाही. हा बहुसंख्य हिंदूंचा अपमान आहे. ता.क. तथाकथित पुरोगामी नीही निषेध करायला हरकत नाही.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

World Cup पूर्वी कोहलीने उघडलं गुपित, यामुळे खास आहे महेन्द्र सिंग धोनी