Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विमानाच्या लँडिंग गिअरला चिकटून 19 हजार फुट उंचीवरही सुखरुप 16 वर्षीय मुलगा

विमानाच्या लँडिंग गिअरला चिकटून 19 हजार फुट उंचीवरही सुखरुप 16 वर्षीय मुलगा
, सोमवार, 8 फेब्रुवारी 2021 (13:08 IST)
विमानाच्या खालच्या भागात लँडिंग गिअरला चिकटून 16 वर्षीय मुलाने प्रवास केल्याची आश्चर्यकारक घटना समोर आली आहे. लंडनहून उड्डाण घेतल्यानंतर जेव्हा फ्लाइट नेदरलँडच्या हॉलेंड पोहचली तेव्हा स्टाफला लँडिंग गिअरजवळ एक मुलगा असल्याचं दिसलं.
 
साधरण 19 हजार फूट उंचीवर फार जास्त थंड वातावरण असल्याने या मुलाला हायपोथर्मिया झाला आहे. त्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. एका मीडिया हाऊच्या रिर्पोटनुसार, या मुलाने लँडिंग गिअरला चिकटून साधारण 510 किलोमीटरचा प्रवास केला. हॉलेंडच्या मास्ट्रिच्ट एअरपोर्टवर फ्लाइट लँड केल्यावर त्याला उतरविण्यात आले.
 
हा मुलगा तुर्की एअरलाइन्सच्या कार्गो फ्लाइटच्या लँडिंग गिअरला चिकटला होता. एक दिवसाआधीच ही फ्लाइट केनियाहून इस्तांबुल मार्गे लंडनला पोहोचली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

PAN Card वरील Photo आणि Signature या प्रकारे बदला, सोपी पद्दत जाणून घ्या