Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चालत्या स्कुलबसमध्ये ड्रायव्हर बेशुद्ध, मुलाने आपल्या समजुतीने 66 लोकांचे प्राण वाचवले

चालत्या स्कुलबसमध्ये ड्रायव्हर बेशुद्ध, मुलाने आपल्या समजुतीने 66 लोकांचे प्राण वाचवले
असे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, जे पाहून आपला दिवस उजाडतो. लोक बिनदिक्कतपणे असे व्हिडिओ शेअरही करतात. नुकताच असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये 7वी वर्गातील मुलाने आपल्या समजुतीने 66 शाळकरी मुलांचे प्राण वाचवले. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये स्कूल बसचा चालक बस चालवताना दिसत आहे. बस चालकाला अचानक गुदमरल्यासारखे वाटू लागते. त्यानंतर तो सीट बेल्ट व्यवस्थित करतो. मग तो डोक्यावरची टोपी काढतो.
 
चालत्या बसमध्ये चालक बेशुद्ध पडला
यानंतर तो मायक्रोफोनमध्ये काहीतरी बोलतानाही दिसत आहे. त्यानंतर चालक आपल्या जसं तसं करुन बस चालवतो. अचानक ड्रायव्हरला बसमध्ये झटके येऊ लागतात आणि तो बेशुद्ध होतो. यादरम्यान बसही धावत असते. हे बघून एक मुलगा लगेच धावत येतो आणि पायाने ब्रेक दाबून बसचा गियर टाकतो. ब्रेक लावताच बस थांबते. त्यानंतर मुलाने बस ड्रायव्हरला मदतीसाठी 911 वर कॉल केला. मुलाच्या या समजुतीमुळे स्कूल बसमधील इतर सर्व मुलांचे प्राण वाचले नाहीतर मोठी दुर्घटना घडू शकली असती.
 
या प्रकरणाचा तपास सुरू आहे
डिलन रीव्हज असे या मुलाचे नाव आहे. मात्र तब्येत ठीक नसल्याची माहिती बस चालकाने परिवहन तळाला दिली. सध्या बस चालक मद्यधुंद होता का, याचा तपास सुरू आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फिल्मफेअर पुरस्कारांवरून अनुपम खेर यांची नाराजी