Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

VIDEO अळ्या-किड्यांनी भरलेले मोमोज बघून लोकं हादरले

VIDEO अळ्या-किड्यांनी भरलेले मोमोज बघून लोकं हादरले
, गुरूवार, 2 नोव्हेंबर 2023 (15:35 IST)
Worms Stuffed Momos जगभरात खाण्यापिण्याच्या बाबतीत चीन खूपच आगळेवेगळे पदार्थ खात असल्यामुळे प्रसिद्ध म्हणा वा बदनाम आहे असे म्हटले तरी हरकत नाही. चीन हा तोच देश आहे ज्यावर जगभरात कोरोना व्हायरस पसरवल्याचा आरोप केला गेला आहे. चीनचे लोक असे पदार्थ खातात जे खाण्याचा कोणीही विचार देखील करू शकत नाही.
 
अलीकडेच सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका व्हिडिओत एक माणूस मोमोज बनवताना दिसत आहे. मोमोज ऐकल्यावर अनेकांच्या तोंडाला पाणी सुटलं असेल आणि मनात चिकन किंवा व्हेज मोमोज आठवले असतील पण याने मोमोजमध्ये असे काही भरले की ते बघून सगळे शॉक होत आहेत. यामध्ये एका व्यक्तीने जिवंत कीडे भरले. यानंतर ते थेट वाफवले आणि मोमो वाफवून लोकांना दाखवले.
 
वळवळ करत होत्या अळ्या
व्हायरल व्हिडिओ चीनचा असल्याचे सांगितले जात आहे. यात माणसाना आधी मोमो तयार करण्यासाठी पिठं लाटून त्यात अळ्या-कीडे भरले आणि सोबत काही दाणेदेखील भरले. मोमोला पॅक करुन थेट स्टीमरमध्ये टाकले आणि वाफ दिली. काही वेळाने मोमोज बाहेर काढले तेव्हा कीडे चांगले शिजून गेले होते. ते तोडून देखील व्हिडिओत दाखवण्यात आले आहे.
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Chinese street food 2023 (@chinesestreetfood2023)

यूजर्स हैराण
हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होताच व्हायरल झाला. लोकांनी हे बघून चीनचा हाच चेहरा खरा असल्याचे म्हटले. अनेकांनी कमेंट केले असून एका व्यक्तीने लिहिले की कोरोना पसरल्यानंतरही हा देश सुधारण नाही. तर हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युजरने म्हटले की हे लोक एक दिवस माणसंही खायला सुरुवात करतील. तर एकााने लिहिले की आता चीन आणखी एक महामारी पसरवण्याच्या तयारीत दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

RIMS वसतिगृहात वैद्यकीय विद्यार्थ्याचा जळालेला मृतदेह सापडला