आपल्या देशात जुगाडू लोकांची कमी नाही. काही लोकांमध्ये नवीन नवीन जुगाड करण्याचा छन्द असतो. ते सतत काही नकाही नवे प्रयोग करत असतात. असाच एक दुचाकी बाईकची चारचाकी बाईक बनवण्याचा जुगाड सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अशी बाईक कदाचित आपण बघितली नसेल. ही जुगाडू चारचाकी बाईक टायर वर टायर चढवून बनवली आहे. या बाईकचे टायर एकावर एक चढवले आहे.
व्हायरल व्हिडीओ मध्ये एक तरुण या उंच बाईकवर चढून बसण्यासाठी बाईक दोघांनी धरून ठेवली आहे. नंतर हा तरुण बाईक सुरु करतो आणि चारचाकी बाईक चालवतो. हा तरुण खूप सहजपणे बाईक चालवताना दिसत आहे.
हा व्हिडीओ पाहून काही युजर्सने त्याची खिल्ली उडवली आहे तर काहींनी प्रतिसाद दिला आहे.
काही या तरुणाला टोला लगावत आहे तर काहींनी याचे कौतुक केले आहे. लोक हा व्हिडीओ पाहून आपापल्या प्रतिक्रिया देत आहे.