सोशल मीडियावर सध्या एका आजींना व्हिडिओ खूप व्हायल होत आहे. यात या आजी पहिल्यांदाच पिझ्झा खात असल्याचे कळून येत आहे. या दरम्यान पिझ्झा खाल्ल्यानंतर आजींनी दिलेले एक्सप्रेशन्स लोकांना आवडत आहे. हा व्हिडिओ बघितल्यावर आपल्यालाही नक्कीच हसू येईल. 28 ऑक्टोबर रोजी इंस्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. यावर 50 हजाराहून अधिक लाइक्स आहेत.
व्हायरल व्हिडिओ क्लिपमध्ये दोन महिला पिझ्झा घेऊन बसलेल्या दिसत आहे. यात एक महिला पिझ्झाचा एक स्लाइस उचलून आजींना देते. आजी त्याला बघते आणि त्याचा स्वाद घेते आणि लगेच काही असे हावभाव देते की बघायला मजा येतो. आजी पिझ्झा खाऊन हसत-हसत वेगळेच एक्सप्रेशन्स देते. तर आपण ही बघा हा क्यूट व्हिडिओ-
आजीचा हा क्यूट व्हिडिओ इंस्टाग्रामवर greesh_bhatt_ नावाच्या अकाउंटद्वारे शेअर करण्यात आला आहे. यूजरने कॅप्शनमध्ये लिहिले आहे कीनानी अर्थात आजीने पहिल्यांदा पिझ्झा खाल्ला हा व्हिडिओ सोशल मीडिया यूजर्सला खूप आवडत आहे.