फेसबुकने आता ई-कॉमर्स मार्केटमध्येही एन्ट्री करण्याचे ठरवले आहे. यासाठी फेसबुकने काही नामांकित ब्रँड्ससोबत चर्चा सुरु केली आहे. येत्या जून महिन्याच्या सुरुवातीलच फेसबुक भारतात आपली ई-कॉमर्स वेबसाईट लॉन्च करणार आहे. सध्या या वेबसाईटचे टेस्टिंग सुरु आहे.
फेसबुक आपल्या ई-कॉमर्स वेबसाईट नवीन टूल्स विकसित करणार असून, कुठल्याही कंपनीला प्रॉडक्ट्स अपलोड करणे आणि स्टॉक मॅनेज करणे शक्य होईल, अशा पद्धतीचे वेबसाईटचे स्वरुप असेल. वर्षअखेरपर्यंत फेसबुक पेमेंट सिस्टमसुद्धा सुरु करणार आहे. गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात फेसबुकने पहिल्यांदा मार्केटप्लेस भारतात लॉन्च केले. त्यानंतर फेसबुक सातत्याने मार्केटप्लेसला विकसित केले जात आहे. आता याच माध्यमातून ग्राहकांना ई-कॉमर्सला जोडण्याचा प्रयत्न फेसबुकने सुरु केला आहे.