rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

फेसबुक लवकरच डेटिंग फीचर आणणार

dating feature of facebook
, गुरूवार, 3 मे 2018 (15:36 IST)
तरुणांना आकर्षित करण्यासाठी फेसबुक लवकरच डेटिंग फीचर आणणार असून केवळ डेटिंगसाठीच नाही तर तरुण तरुणींमधील हे नातं अधिक घट्ट व्हावं, दीर्घ काळ टिकावं असा त्याचा उद्देश आहे, असं सांगितलं जात आहे. अनेक लोक आपला आयुष्यभराचा साथीदार शोधण्यासाठी फेसबुक वापरतात. त्यामुळे डेटिंगपासून सुरुवात करून विवाहबद्ध होण्यापर्यंत फेसबुक एखाद्या मध्यस्तासारखी मदत करणार आहे.
 
 

फेसबुकच्या माहितीनुसार, हे फीचर मुख्य अॅपचाच भाग असेल. तसेच हे फीचर सर्वांसाठी ऑप्शनल असेल. हे फीचर वापरावं की नाही ते अकाऊंट हाताळणाऱ्यावर अवलंबून असेल. यामध्ये प्रायव्हसी आणि सेफ्टी या दोन्हींचा विचार केला गेला आहे. ही माहिती कोणालाही देण्यात येणार नाही. तसेच तुमचे फेसबुक फ्रेंडस् देखील हे पाहू शकणार नाहीत. केवळ जे लोक डेटिंग प्रोफाईल वापरत असतील असेच लोक एकमेकांना डेट करू शकतील. मात्र फेसबुक फ्रेंड जर हे फीचर वापरत असतील तर त्यांची माहिती आपल्याला मिळेल का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अद्याप या फीचरची तपासणी सुरू आहे. मात्र काही महिन्यांतच हे फीचर सगळ्यांना वापरता येईल अशी शक्यता वर्तवली जात आहे.


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रीती झिंटाची धमकी, इंदूरला येणार नाही