Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सहा महिन्यांनी पिकनिक स्पॉटवर तरुण-तरुणीचे सापळे सापडले

सहा महिन्यांनी पिकनिक स्पॉटवर तरुण-तरुणीचे सापळे सापडले
पोलिसांनी सहा महिने जुने एक प्रकरण उघडकीस आणले आहे ज्यात एका तरुण आणि तरुणीची हत्या केली गेली होती. आता दोघांचे सापळे जप्त झाले आहेत.
 
इंदोर क्राईम ब्रांचने बगोंदा पोलिसासह संयुक्त कारवाई करत चार तरुणांना अटक केली आहे. हे तरुण मेंदी कुंड पिकनिक स्पॉटवर फिरायला येणार्‍या तरुण तरुणींवर नजर ठेवत असून संधी सापडताच त्यांना लूटचा शिकार बनवायचे. चौकशीत त्यांनी हत्या केल्याची कबुली दिली. त्यावरून क्राईम ब्रांचने दोन सापळे जप्त केले आहे.
 
मेंदी कुंड इंदूरहून जवळ एक पिकनिक स्पॉट आहे जिथे तरुण तरुणी येत जात असतात. नोव्हेंबर 2017 मध्ये येथे फिरायला आलेले एक तरुण- तरुणी बेपत्ता झाले होते. हिमांशू सेन असे तरुणाचे नाव होते आणि दोघेही महू क्षेत्रातील रहिवासी होते.
 
या दरम्यान, काही दिवसांपूर्वी चार तरुण-तरुणी येथे फिरायला आले तेव्हा आरोपींनी त्यांना बंधक बनवून जंगलात घेऊन गेले. त्यांच्यासोबत मारहाण व लूटपाट केली. यातून एकाने आपल्या मोबाइलने आपल्या मित्राला प्रकरण कळवले. नंतर त्यांचा मित्र बडगोंदा पोलिसाकडे पोहचला.
 
पोलिसांनी जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केले गेले. तेव्हा तर आरोपींना पळ काढला नंतर त्यांना अटक करण्यात आली. गोविंद, बलराम, केशव आणि अजय या आरोपींनी नोव्हेंबर 2017 मध्ये एक तरुण आणि तरुणीला निर्वस्त्र करून जाळल्याचा गुन्हा स्वीकारला.
 
जळलेले मृतदेह उंचीवरून फेकून त्यांनी दगडाने त्यांचे चेहरे ठेचून नंतर त्यांना दगडांमागे लपवून दिले. तरुण तरुणीचे सुमारे 20 वयाचे असावे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शिवसेना-भाजप विधानपरिषदेसाठी एकत्र