गोरं दिसणं हे खरंच गरजेचं आहे का !

फेअरनेसमुळे आत्मविश्वास वाढतो ! आपल्या सावळ्या रंगामुळे हुशार असूनही ती व्यक्ती पुढे वाढण्यात अयशस्वी ठरते... लग्नाला सरळ नकार दिला जातो..चार लोकांमध्ये दुर्लक्ष केलं जातं...आणखी सावळ्या रंगामुळे नको त्या नकारात्मक गोष्टी बुद्दू बॉक्सद्वारे मनात भरवण्यात येतात....नंतर एखादी चमत्कारी क्रीमने लगेच रंग पालटतो आणि यश हाती लागू लागतं..लोकं जणू ती व्यक्ती वेड लावते.. सगळे त्यांना बघून स्तब्ध होतात.... पण हा सगळा मूर्ख प्रकार चालू असताना आणि त्याच्या मोह जाळेत फसवून लगेच दुकानाचा धावा करताना कधी हा विचार केला आहे की खरंच असं होत असतं तर जगात सावळे लोकं उरलेच नसते... आणि सर्व फेअर लोकांनी उंची गाठली असते....पण एकदा नजर फिरवून बघा की व्यवसायात यशस्वी प्रत्येक बिझनेसमॅन, खेळात यशस्वी प्रत्येक खेळाडू, किंवा ऑफिसच्या एखाद्या उच्चपदावर असीन प्रत्येक माणूस गोराच आहे का? शक्यच नाही...भारतातील हवामानाप्रमाणे येथील लोकांच्या त्वचेचा रंग साधारणात: सावळाच... मग त्यावर क्रीम लावून किंवा घासून तो रंग गोरा होणे शक्य कसे होणार पण हा विचार एखाद्याचा मेंदूत शिरतच नसेल तर काय परिणाम समोरा येतात हे मध्य प्रदेशातील भोपाळमधील एक प्रकरण बघून समजण्यात येऊ शकतं.
 
येथील एक महिलेने तिच्या पाच वर्षांच्या सावळ्या मुलाला गोरं करण्यासाठी त्याला चक्क दगडाने घासलं असल्याचा प्रकार समोर आला आहे. सुधा तिवारी असं आरोपी महिलेचं नाव असून तिने मुलाला दत्तक घेतलं होतं. गोरं करण्यासाठी महिला त्याचं शरीर दगडाने घासत होती, अशी माहिती चाइल्ड लाइनला मिळाली होती. त्यानंतर पोलिस आणि चाइल्ड लाइनने या मुलाची सुटका केली. महिलेच्या मोठ्या बहिणीच्या मुलीने ही माहिती चाइल्ड लाइनला दिली होती.
 
आरोपी महिलेने उत्तराखंडच्या मातृछायामधून दीड वर्षांपूर्वी या मुलाला दत्तक घेतलं होतं. आरोपी सुधा तिवारी व्यवसायाने शिक्षिका असून ती सरकारी शाळेत शिकवते. तर महिलेचा पती खासगी रुग्णालयात काम करतो, असं तक्रारदार शोभना शर्माने सांगितलं.
 
शोभना शर्मा म्हणाल्या की, "सुधाने ज्या दिवसापासून मुलाला भोपाळमध्ये आणलं, त्या दिवसापासून तिला त्याचा सावळा रंग पटत नव्हता. तिने मुलावर खूप उपचार केले. सुमारे एक वर्षापूर्वी कोणीतरी तिला सल्ला दिला की, मुलाला काळ्या रंगाच्या दगडाने घासलं तर तो गोरा होऊ शकतो. यानंतर महिलेने मुलाचं शरीर काळ्या रंगाच्या दगडाने घासायला सुरुवात केली. पण यामुळे मुलाच्या मनगट, खांदा, पाठ आणि पायांना जखम झाली आहे."
 
आता हा पूर्ण प्रकार बघता या तर त्या बाईला मुलं स्वत:च नसल्यामुळे त्याच्या आरोग्याबद्दल काळजी वाटली नसावी किंवा तिची समज एवढी गहाण ठेवलेली असावी. परंतू शिक्षिका असून या प्रकार घडणे नवलच आहे. शिक्षित तर सोडा अनाडी लोकांकडून हे अपेक्षित नाही. परंतू या सर्वांना फेअर दिसण्याची स्पर्धा करणार्‍यांना जाहिराती जवाबदार आहेत यात काही शंका नाही. कारण सतत आपल्याला याची जाणीव करून देणार्‍या जाहिराती की गोरे दिसणारे सुंदर आणि यशस्वी असतात हे कुठेतरी डोक्यात घर करून जातं.
 
हा प्रकार बघून खरंच गरज आहे जागरूक व्हायची आणि हे समजून घेण्याची की आपण निसर्गाची भेट आहोत आणि त्याने ज्यात रंग- रूपात त्याच्या आपल्या व्यक्तिमत्त्वावर प्रभाव पडता कामा नये. कारण काम बोलतं, रूप नव्हे.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख आठशे फुट खोल दरीत फेकले, तरीही गर्भवती वाचली