देशात ज्या वेगानं कोरोना केसे वाढत आहे त्याच वेगानं या प्राणघातक संक्रमणापासून बचवासाठी अनेक घरगुती उपचार व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या अशाच एका मेसेजमध्ये दावा केला जात आहे की सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना संसर्गचा नायनाट होतो.
काय आहे दावा -
सोशल मीडियावर एक ऑडियो शेअर होत आहे ज्यात दावा केला जात आहे की सैंधव मीठ आणि लाल कच्चा कांदा सोलून खाल्ल्याने 15 मिनिटानंतर कोरोना रुग्ण बरा होतो.
काय आहे सत्य-
व्हायरल होत असलेला दावा सत्य नसल्याचं कळून आलं आहे. भारत सरकाराच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्यूरो (PIB) च्या फॅक्ट चेक विंगने ट्विट करत हा दावा खोटा असल्याचं म्हटलं आहे. हे असत्य आहे. PIB प्रमाणे याचे कुठलेही वैज्ञानिक प्रमाण नाही की सैंधव मिठासह कच्चा कांदा खाल्ल्याने कोरोना व्हायरसवर उपचार केला जाऊ शकतो.
वेबदुनियाकडून सर्व वाचकांना अपील करण्यात येत आहे की कोणताही मेसेज, व्हिडिओ आणि ऑडिओची सत्यता तपासल्याशिवाय स्वत: फॉलो किंवा फॉरवड करु नये.