Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कांद्याचे दर गडगडले, लाल ४२२, उन्हाळ कांदा ४४९ रुपयांनी घसरला

कांद्याचे दर गडगडले, लाल ४२२, उन्हाळ कांदा ४४९ रुपयांनी घसरला
, मंगळवार, 23 मार्च 2021 (08:17 IST)
कांद्याचे महत्वाचे आगर म्हणून परिचित असलेल्या पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत गत सप्ताहाच्या तुलनेत चालू सप्ताहात लाल कांद्याचे दर ४२२ रुपयांनी तर उन्हाळ कांद्याचे दर ४४९ रुपयांनी गडगडल्याने कांदा उत्पादक चिंतेत सापडले आहे. पिंपळगाव बाजार समितीत लाल, कांद्यासह उन्हाळ कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर वाढल्याने जिल्ह्यातील कांद्यास बाहेरील राज्यात उठाव नसल्याने कांदा दरात घसरण झाली आहे. 
 
कोरोना लॉकडाउन धास्ती आणि त्यातच अवकाळी पावसाने कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने कांदा उत्पादक आधीच चिंतेत असताना त्यात कांदा दर पुन्हा घसरू लागल्याने उत्पादन खर्चही निघने जिकरिचे झक्याने उत्पादक  आर्थिक कोंडीत सापडला आहे. पिंपळगाव बाजार समितीत गत सप्ताहातील सोमवारी लाल कांद्यास जास्तीत जास्त १५२५ कमीत कमी ११००, तर सरासरी १३५१ बाजार भाव, तर उन्हाळ कांद्यास जास्तीत जास्त १८००, कमीत कमी ९००, सरासरी १४५१ बाजारभाव मिळाला होता. मात्र चालू सप्ताहातील सोमवारी लाल कांद्यास जास्तीत जास्त ११०३ तर उन्हाळ कांद्यास जास्तीत जास्त १३५१बाजार भाव मिळाला.गत सप्ताहाच्या तुलनेत कांदा दर घसरल्याने कांदा उत्पादकांच्या नाराजीचा सुरू दिसत आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पतीला ठार मारण्याची धमकी देत नराधमाने केला बलात्कार