डीआरडीओ भरती 2020: DRDO म्हणजे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन मध्ये ज्युनिअर रिसर्च फेलोशिप साठीच्या रिक्त पदांना भरती करण्यासाठी थेट मुलाखतीतून निवड केली जाणार आहे. मुलाखतीसह 4 ते 11 जानेवारी 2021 या कालावधीत ही भरती होणार आहे. जेआरएफ पदांसाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 31000 रुपये वेतन दिले जाणार. एकूण 16 जेआरएफच्या पदांसाठी DRDO जानेवारी मध्ये मुलाखत घेणार आहे.
DRDO च्या जेआरएफ भरती मुलाखती मध्ये भाग घेणाऱ्या उमेदवारांकडून अभियांत्रिकी पदवी (बीई / बीटेक) प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झालेली असावी. या सह उमेवाराने नेट/गेट परीक्षा देखील उत्तीर्ण केली पाहिजे किंवा संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी घेतली पाहिजे.
रिक्त पदांचे तपशील -
मेकॅनिकल इंजिनीअरिंग -एकूण 6 पदे.
ऑटोमोबाइल इंजिनीअरिंग - एकूण 3 पदे.
इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंग -एकूण 3 पदे.
कॉम्प्युटर सायन्स इंजिनीअरिंग -एकूण 4 पदे.
मुलाखतीचे ठिकाण - विहिकल रिसर्च ऍड डेवलपमेंट एस्टैब्लिशमेंट, वहान्नगर, अहमदाबाद
मुलाखतीची वेळ - 4 जानेवारी ते 11 जानेवारी 2021 (सकाळी 11 वाजेपासून).
मुलाखतीच्या वेळी, उमेदवारांनी अर्ज फॉर्म आणि आवश्यक मार्कशीट, फोटो, आयडी कार्ड, पॅन कार्ड इत्यादी आपल्यासह ठेवणे आवश्यक आहे.