rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज इंदूरमध्ये अंत्यसंस्कार

Funeral ceremony
, बुधवार, 13 जून 2018 (08:35 IST)
अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या पार्थिवावर आज मध्यप्रदेशातील इंदूरमध्ये अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. याआधी आज सकाळी 9 ते साडेबारा वाजेपर्यंत त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता इंदूरमधल्या मुक्तीधाममध्ये अंत्यसंस्कार करण्यात येतील. भय्यू महाराज यांनी मंगळवारी इंदूरमधल्या राहत्या घरी त्यांनी गोळी झाडून आत्महत्या केली होती. 
 
भय्यू महाराज यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी मिळाली असून, जीवनातील तणावातून आपण आत्महत्या करत असल्याचं त्यांनी चिठ्ठीत लिहिलं आहे. दरम्यान ही आत्महत्या आर्थिक विवंचनेतून झाली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पोलिसांचा तपास अद्याप सुरु आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

भय्यु महाराजांचे सुसाइड नोट, मी तणावात दुनिया सोडून जात आहे