Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

हैदराबादमध्ये देशातला पहिला ‘डॉग पार्क’

हैदराबादमध्ये देशातला पहिला ‘डॉग पार्क’
, मंगळवार, 18 सप्टेंबर 2018 (08:58 IST)
देशातला पहिला ‘डॉग पार्क’(श्वान उद्यान) हैदराबाद शहरात सुरू होत आहे. सर्वसाधारण उद्यानात पाळीव कुत्रा फिरण्यास आणू नये, अशा लोकांच्या तक्रारी असतात. परदेशातील अनेक शहरांत पाळीव प्राण्यासाठी विशेष पार्क उभारण्यात आले आहेत. त्याच धर्तीवर बृहन्हैदराबाद महानगरपालिकेने (जीएसएमसी) एक कोटी 10 लाख रुपये खर्च करून 1.3 एकर जागेवर ‘डॉग पार्क’ची उभारणी केली आहे. 
 
या विशेष ‘डॉग पार्क’मध्ये कुत्र्यांना प्रशिक्षण देण्याकरिता, तसेच त्यांच्या व्यायामासाठी उपकरणे बसविण्यात आली आहेत. कुत्र्यांना बाथ घेण्यासाठी स्प्लॅश पूल (तलाव) बांधले आहेत. याखेरीज दोन लॉन्स, एक ऍम्फी थिएटर, कॅफे, छोट्या व मोठ्या कुत्र्यांना पार्कमध्ये ठेवण्यासाठी वेगवेगळ्या सुविधा उभारण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकार्‍याने सांगितले. येथे डॉग ट्रेनर, स्वच्छतेसाठी स्टॅण्डर्ड सुविधा आणि मोफत लसीकरण या सुविधा पुरविण्यात येणार आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

आता 'या' तीन बँकांच्या विलीनीकरणाचा निर्णय