मी एक कलाकार असून माझा राजकारणाशी संबंध नाही. मला राजकारणात रसही नाही. त्यामुळे राजकारण प्रवेशाचा प्रश्र्नच येत नाही आणि मी राजकारणात येण्याचा कधी प्रयत्नही करणार नाही, असा खुलासा अभिनेत्री माधुरी दीक्षित हिने केला आहे.
सरकारने पाठिंब्यासाठी पुढाकार घेऊन भेटीचा कार्यक्रम आखला आहे. त्या अंतर्गत ते इतरांनाही भेटले आहेत. त्या दिवशी ते फक्त मलाच नाहीतर रतन टाटा यांनाही भेटले. ही मुलाखत केवळ कार्यक्रमाचा भाग होता, असेही तिने स्पष्ट केले.
एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती दरम्यान तिने याबाबत खुलासा करून आपण राजकारणात येणार नसल्याचे संकेत दिले आहे.
भाजपच्या 'संपर्क फॉर समर्थन' मोहिेंतर्गत पक्षाध्यक्ष अतिम शहा यांनी सेलिब्रिटींच्या भेटी घेण्याचा धडाका लावला आहे. यातच त्यांनी अभिनेत्री माधुरी दीक्षितची भेट घेतली. परंतु, या भेटीनंतर चर्चा रंगली ती माधुरीच्या राजकारणातील प्रवेशाची. परंतु, या चर्चेला माधुरीने आता पूर्णविरा दिला आहे.