rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माधुरीच्या पहिल्या मराठी चित्रपटात हा चॉकलेट बॉय

Madhuri Dixit
धक धक गर्ल माधुरी दीक्षितचा पहिला मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचे पहिले गाणे नुकतेच रिलीज करण्यात आले आहे. सतरंगी झालेल्या माधुरीच्या या चित्रपट चॉकलेट बॉय पाहुण्या कलाकाराची भूमिका करत आहे. तो चॉकलेट बॉय अजून कोणी नसून माधुरीचा चाहता रणबीर कपूर आहे. आणि विशेष म्हणजे तो चक्क मराठी बोलतोय.
 
धर्मा प्रॉडक्शन अर्थातच करण जोहर या चित्रपटाच्या निमित्ताने पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीशी जुळले आहेत. माधुरी या चित्रपटात चाळिशीतील गृहणी मधुरा सानेच्या भूमिकेत आहे. सानेंच्या घरची ही सून हृदय दान करणार्‍या एक तरुणीच्या इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करताना दिसतेय. चित्रपटाचे दिग्दर्शन तेजस देऊस्करने केले असून सुमित राघवन, वंदना गुप्ते, रेशम टिपणीस, रेणुका शहाणे हे चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसून येतील. येत्या २५ मे रोजी बकेट लिस्ट रिलीज होणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘राझी’ वर पाकिस्तानात बंदी