Indore News :स्वातंत्र्य दिनाची देशभरात जय्यत तयारी सुरू झाली आहे. मध्य प्रदेशातही 15 ऑगस्टची विशेष तयारी सुरू आहे. इंदूर पोलिसांनी शनिवारी तिरंगा यात्रा काढली. यावेळी यात्रेत पोलीस कर्मचारी व सर्वसामान्य नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तिरंगा यात्रेदरम्यान रस्त्याच्या मधोमध अशी घटना घडली की, तिरंगा यात्रा आटोपल्यानंतर सर्वजण हे दृश्य पाहू लागले. इंदूरमधील गांधीनगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात असलेले टीआय अनिल यादव यांनी तिरंगा यात्रेदरम्यान देशभक्तीपर गाण्यांवर नाचण्यास सुरुवात केली. त्यांचे डान्सचे स्टेप्स पाहून सगळेच थक्क झाले.
त्यानंतर उपस्थित प्रत्येक पोलीस कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकही देशभक्तीपर गाण्यांवर नाचू लागले. टीआय यादव यांनी यापूर्वीच इंदूरमध्ये आपली सेवा दिली आहे. त्यादरम्यान त्यांचा एक व्हिडिओही व्हायरल झाला होता. जो लोकांना खूपच आवडला
देशभक्तीपर गाण्यांच्या तालावर नाचणाऱ्या गांधीनगर पोलिस स्टेशनचे प्रभारी अनिल यादव यांचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर लोक देशभक्तीशी संबंधित अनेक कमेंट करत आहेत. इंदूरच्या मुसाखेडी चौकात इंदूर पोलिसांतर्फे तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमात मोठ्या संख्येने पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. देशभक्तीपर गाण्यांवर यादव यांच्या नृत्यानंतर कार्यक्रमाचे संपूर्ण वातावरणच बदलून गेले आणि कार्यक्रमात उपस्थित सर्व पोलीस कर्मचारी नाचू लागले.
हातात तिरंगा घेऊन नाचले. डान्स पाहून लोक त्याला फुलांचा हार घालण्यासाठी पुढे येत आहेत. टीआयने ज्या पद्धतीने डान्स केला ते पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.