एका नेटकऱ्याने दिली लता दीदीना शिवी

शनिवार, 19 मे 2018 (09:03 IST)
गानकोकिळा लता मंगेशकर यांना रमजानच्या शुभेच्छांच्या बदल्यात एका नेटकऱ्याने शिवी दिली आहे. लता दीदी सोशल मीडियावर अनेकदा शुभेच्छा देत असतात. वाढदिवस पुण्यतिथी किंवा अन्य विशेष दिनांच्यावेळी त्या ट्विटरच्या माध्यमातून आवर्जून शुभेच्छा देतात. रमजानचा महिना सुरू असल्याने त्यांनी ट्वीट करून मुस्लीम बांधवांना रमजानच्या शुभेच्छा दिल्या. त्यावर अनेकांनी त्यांचे आभार मानत त्यांना रीट्वीटही केलं. मात्र, अत्तिक उर रहमान नावाच्या एका नेटकऱ्याने त्यांचे आभार मानण्याऐवजी त्यांच्याविषयी अपशब्द लिहिले. या ट्वीटवर लता दीदींनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. पण, इतर नेटकऱ्यांनी त्याची शाळा घ्यायला सुरुवात केली.  

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख उद्या बहुमत सिद्ध करा, सुप्रीम कोर्टाचा आदेश