भारतात सर्वात जास्त बोलल्या जाणाऱ्या भाषांमध्ये मराठी भाषा तिसऱ्या क्रमांकावर पोहोचली आहे. जनगणेच्या सर्वेक्षणात मराठी ही हिंदी व बंगाली नंतर सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा असल्याची माहिती समोर आली आहे.
जणगणना सर्वेक्षणानुसार, मराठीने तेलगुला मागे टाकत, तिसरं स्थान मिळवलं आहे. तर, हिंदी व बंगालने आपली जागा कायम ठेवत अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला आहे. २००१ च्या सर्वेक्षणात ४१.०३ टक्के लोकांची हिंदी मातृभाषा होती. आता ही संख्या दोन टक्क्यांनी वाढून ४३.६३ टक्के झाली आहे. बंगाली आपल्या स्थानावर स्थिर असून मराठीने तेलगुची जागा घेतली आहे. मात्र हिंदुस्थानमधील २२ अनुसूचित भाषामध्ये समाविष्ट असणाऱ्या संस्कृत भाषेला उतरती कळा आली आहे. फक्त २४,८२१ लोकांची बोलीभाषाही संस्कृत आहे. यापाठोपाठच, बोडो, मणिपुरी, कोकणी, डोंगरी या भाषांचाही समावेश होतो. मात्र इंग्रजीने आपला दबदबा नेहमी प्रमाणे कायम ठेवला आहे. साधारणपणे, २.६ लोकांची प्रथम भाषा इंग्रजी आहे. ज्यातील १.६ लाख भाषिक हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. यानंतर तामिळनाडूचा क्रमांक लागतो. तर केरळ हे अनुक्रमे तिसऱ्या स्थानावर आहे.
राजस्थानमध्ये १.०४ करोड भाषिक हे भिल्ली/ भिलौडी भाषा बोलतात तर, गोन्डी भाषा बोलणाऱ्यांची संख्या २९ लाख आहे. २००१ मधील जणगणणेनुसार प. बंगाल ८.११ टक्के लोकसंख्येतील ८.३ टक्के लोक हे बंगाली भाषिक आहेत. मराठी भाषिकांची संख्या २००१ ला ६.९९ टक्के एवढी होती. २०११च्या सर्वेक्षणात ती वाढून ७.०९ टक्के एवढी झाली आहे. तर तेलगुची टक्केवारी घसरली असुन ७.१९ टक्क्यांवरून ६.९३ टक्क्यांवर आली आहे.