Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Friday, 28 March 2025
webdunia

जगातील सर्वात गोंडस कुत्र्याची हृदय तुटल्याने मृत्यू

जगातील सर्वात गोंडस कुत्र्याची हृदय तुटल्याने मृत्यू
जगातील सर्वात क्यूट बू नावाच्या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. कुत्र्याच्या मालकाप्रमाणे तो मागील वर्षी आपल्या साथी कुत्र्याच्या मृत्यूनंतर अस्वस्थ राहत होता.
 
पॉमेरियन ‘बू’ आणि त्याचा साथी ‘बडी’ यांचे फोटो इंटरनेटवर शेअर केल्यानंतर दोन्ही कुत्र्यांचे फेसबुकवर 16 लाख फॉलोअर्स आहे.
 
बू आणि बडी 11 वर्षांपर्यंत सोबत राहिले. बू च्या मृत्यूनंतर अमेरिकन मालकाने फेसबुकवर एक पोस्ट शेअर करत सांगितले की 12 वर्षाच्या या कुत्र्याने शनिवारी झोपेत प्राण सोडले.
 
बू 12 वर्षाचा होता. बू च्या मालकाने लिहिले की ‘‘बडी च्या मृत्यूनंतर बू ला हृदय संबंधी त्रास सुरू झाला होता. त्यांच्याप्रमाणे बडीच्या मृत्यूनंतर बू ला धक्का बसला.
 
बू चं अमेरिकन मालक अनेकदा या पेजवर बू आणि त्याच्या साथीचे फोटो शेअर करत होते. 
 
मागील वर्षी बू साथीचा मृत्यू झाल्यावर बू मध्ये काही बदल जाणवत होते. साथी गेल्यामुळे बू उदास झाला होता. बू अधिक दिवस जिवंत राहू शकला नाही, बहुतेक हेच यामागील कारण असावे. तो साथीच्या मृत्यूचा दुःख सहन करू शकला नाही, त्यातून बाहेर पडणे त्यासाठी अशक्य झाले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

या एका झाडाला लागतात 40 प्रकारची फळे, किंमत मात्र विचारूच नका