Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

राज ठाकरे यांच्या मुलाचे लग्न, राहुल गांधी यांना बोलावले पण PM नरेंद्र मोदी यांना नाही दिले निमंत्रण

राज ठाकरे यांच्या मुलाचे लग्न, राहुल गांधी यांना बोलावले पण PM नरेंद्र मोदी यांना नाही दिले निमंत्रण
, शुक्रवार, 11 जानेवारी 2019 (10:40 IST)
महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना आपल्या मुलाच्या लग्नाचे निमंत्रण पाठवले आहे. त्यानंतर आता 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस आणि एमएनएस यांच्या युतीचे वृत्त परत एकदा चर्चेत आले आहे. तसेच चर्चा अशी देखील आहे की पीएम नरेंद्र मोदी यांना कदाचित बोलवण्यात येणार नाही.  
 
राज ठाकरे यांनी राहुल गांधी यांना लग्नाचे निमंत्रण पाठवण्यासाठी आपल्या दोन सचिवांना दिल्लित पाठवले होते. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार आधी ठाकरे स्वत: दिल्ली जाऊन राहुल गांधी यांच्यासोबत बैठक करणार होते, पण नंतर त्यांची यात्रा रद्द झाली आणि त्यांनी आपले दोन सचिव हर्षल देशपांडे आणि मनोज हाटे यांना दिल्ली पाठवले. पण काँग्रेसच्या एका वरिष्ठ नेत्याने या सर्व गोष्टींना चुकीचे म्हणत सांगितले की या यात्रेचे कुठला ही राजनैतिक अर्थ नव्हता.  
 
राज ठाकरे यांचा मुला अमित ठाकरेचे लग्न मिताली बोरुडे हिच्याशी 27 जानेवारी रोजी मुंबईत होणार आहे. ठाकरे यांनी सांगितले होती की या लग्नात सामील होणार्‍या पाहुणे तसे फारच कमी राहणार आहे पण या पाहुण्यांमध्ये काही बिझनेसमेन, नेता आणि ब्यूरोक्रेट्स यांचे नाव सामील होऊ शकतात.  .
 
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल गांधी शिवाय काँग्रेसचे दुसरे नेते जसे सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवड़ा यांना देखील निमंत्रण पाठवण्यात आले आहे. त्याशिवाय NCPचे नेते जसे अजित पवार, सुनिल तटकरे, जयंत पाटिल यांना देखील लग्नात बोलावण्यात आले आहे. माहितीनुसार शरद पवार यांना खास आमंत्रण पाठवण्यात आले आहे.  
 
ठाकरे नुकतेच लग्नाचे निमंत्रण देण्यासाठी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या घरी देखील गेले होते. राज हे महाराष्ट्राचे सीएम देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेता  नीतिन गडकरी यांना  देखील निमंत्रण पाठवणार आहे. आता महत्त्वाचे म्हणजे ठाकरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निमंत्रण पाठवण्यात की नाही.  

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळासाहेब ठाकरेयांचे स्मारक, कोर्टात जनहित याचिका दाखल