rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नानावर केंस दाखल, तनुश्रीच्य आरोपांची दखल

nana patekar
, शुक्रवार, 12 ऑक्टोबर 2018 (09:29 IST)
मुंबई पोलिसांच्या नुसार प्रत्यक्षदर्शींचे जबाब ऐकूनच अभिनेता नाना पाटेकर याला समन्स पाठवण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे म्हटले असून, अभिनेत्री तनुश्री दत्ता हिच्या तक्रारीनंतर नाना पाटेकरवर गुन्हा दाखल केला आहे. प्रत्यक्षदर्शींचा जबाब नोंदवला जाणार आहे असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. हा प्रकार १० वर्षे जुना असल्याने पोलिसांनी सावधगिरीचं बाळगली आहे. २००८ साली हॉर्न ओके प्लीज चित्रपटाच्या शुटींग दरम्यान झालेल्या विनयभंग प्रकरणी नाना पाटेकर, गणेश आचार्य, राकेश सारंग आणि समी सिद्दीकीवर विनयभंगाचा गुन्हा दाखल आहे. #MeToo मुळे हा सर्व प्रकार बाहेर आला आहे. हॉर्न ओके प्लीज' चित्रपटाचे निर्माते सामी सिद्दिकी आणि दिग्दर्शक राकेश सारंग यांचा समावेश आहे. या चौघांविरोधात ३५४ आणि ५०९ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ३ वर्षांच कैद आणि दंड, गुन्हा : लैंगिक उद्देशाने महिलेची छेडछाड, अंगविक्षेप करणे किंवा याच उद्देशाने एखादी वस्तू दाखवणे, एकांत स्थळी असताना लगट करणे., शिक्षेची तरतूद : शिक्षा १ वर्षापर्यंत कैद आणि दंड अशी असणार आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

५० तालुक्यांमध्ये पाऊस झाला नाही तरी मुख्यमंत्री म्हणतात दुष्काळ नाही - सुप्रिया सुळे