Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 24 April 2025
webdunia

लूट लिया रे... गाडीत पेट्रोल टाकवल्यानंतर अंगावर कपडेही नव्हते

petrol price hike meme viral video
, सोमवार, 1 मार्च 2021 (12:49 IST)
सध्या देशात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले असून अनेक शहरांमध्ये पेट्रोल दराने शंभरी ओलांडली आहे. सर्वींकडे याचा विरोध तर सुरु आहेच. पण सोशल मीडिया प्रेमी यातही फन शोधून काढत आहे. पेट्रोल दरवाढीवर मीम्स, जोक्स, व्हिडिओ धडाक्याने शेअर केले जात आहे. जे चांगलेच व्हायल होत आहे.
 
अलीकडेच सोशल मीडियावर व्हायल होत असलेल्या एका व्हिडिओत पेट्रोल भरण्यासाठी तरुण पंपावर पोहचतो आणि पेट्रोल भरुन झालं की तेथून निघताना त्यांच्या अंगावरील कपडे देखील गायब असतात. एकही शब्द न बोलता त्याच्या भावना समजत आहे. हा व्हिडिओला लूट लिया रे... असे स्लोगन देण्यात आले आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून या व्हिडिओला आतापर्यंत एक लाखाहून अधिक लोकांनी पसंती दर्शवली आहे.
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

यो-यो टेस्ट पास होण्याचे वरूणपुढे आव्हान