Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

झोपडीत राहतात 'ओडिशाचे मोदी' प्रताप चंद्र सारंगी, मोदी कॅबिनेटचे मंत्री

झोपडीत राहतात 'ओडिशाचे मोदी' प्रताप चंद्र सारंगी, मोदी कॅबिनेटचे मंत्री
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात सामील झालेल्या सर्वात चर्चित नाव आहे ओडिशाच्या बालासोरहून खासदार प्रताप चंद्र सारंगी. त्यांनी राज्यमंत्री पदाशी शपथ घेतली आहे. सोशल मीडियावर ‘ओडिशाचे मोदी’ नावाने प्रसिद्ध प्रताप चंद्र सारंगी मोदी कॅबिनेटमध्ये सामील असे मंत्री आहे जे सर्वात गरीब खासदार आहे.
 
सायकलवर प्रवास करणारे प्रताप चंद्र सारंगी उडीसामध्ये भाजपचे कर्मठ कार्यकर्ता आहे। पंतप्रधान मोदींनी देखील सार्वजनिक मंचावर त्यांचे कौतुक केलेले आहे.
webdunia
बालासोरहून खासदार 65 वर्षीय प्रताप चंद्र सारंगी यांनी लोकसभा निवडणुकीत बीजेडीचे कोट्याधीश उमेदवार रवींद्र जेना यांना पराभूत करून सर्वांना हैराण केले. यापूर्वी प्रताप सारंगी यांनी 2014 मधील निवडणूक बालासोर येथून लढत हरले होते. सारंगी नीलिगिरी विधानसभा सीटहून दोनदा आमदार राहिलेले आहे.
 
आपल्या समाजसेवेसाठी ओळखले जाणारे प्रताप चंद्र सारंगी बालासोरच्या नीलिगिरीमध्ये एका झोपडीत राहतात आणि सायकल चालवतात. आपल्या साधेपणामुळे प्रसिद्ध प्रताप चंद्र सारंगी यांनी जेव्हा राज्यमंत्री पदाची शपथ घेतली तर भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी ताळी वाजवून त्यांचे अभिनंदन केले.
 
'ओडिशाचे मोदी' नावाने प्रसिद्ध 
लोकसभा निवडणुकीत जिंकल्यानंतर प्रताप चंद्र सारंगी अचानक आपल्या साधेपणामुळे सोशल मीडियावर ओडिशाचे मोदी या नावाने प्रसिद्ध झाले. 65 वर्षाचे अविवाहित प्रताप चंद्र सारंगी देखील पंतप्रधान मोदी यांच्यासारखे आध्यात्मिक आहे.
webdunia
दोनदा संन्यास घेण्याची इच्छा असणारे प्रताप चंद्र सारगी समाजसेवेसाठी काम करत उडीसाच्या मागासलेल्या भागांमध्ये अनेक शाळा उघडून चुकले आहे. मुलांमध्ये अत्यंत लोकप्रिय प्रताप सांरगी यांना पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सासरे मल्हाररावांनी अहिल्याबाईंना सती जाऊ दिले नाही