सुपरस्टार रजनीकांत यांनी ट्वीट करत ३१ डिसेंबर रोजी आपल्या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा केली जाणार असल्याची माहिती दिली. तसंच त्यांचा राजकीय पक्ष जानेवारी महिन्यापासून कार्यरत होईल असंही सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून राजकारणात सक्रीय रजनीकांत यांनी अधिकृतपणे राजकारणात प्रवेश केलेला नाही. गेल्या वर्षी त्यांनी आणि कमल हासन यांनी एकत्र काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. नंतर दोन्ही पक्ष युती करतील अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गेल्या महिन्यात रजनीकांत यांनी आपला राजकीय प्रवेश लांबणीवर पडण्याचे संकेत दिले होते.
रजनीकांत यांनी डिेसेंबर २०१७ मध्ये तामिळनाडूत राजकीय पक्ष स्थापन करत असल्याची घोषणा केली होती. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर ही घोषणा करण्यात आली होती. मात्र लोकसभा नि़वडणुकीत रजनीकांत यांनी सहभाग घेतला नव्हता.