रोहित शर्मा यांना कन्यारत्न प्राप्त झाले

सोमवार, 31 डिसेंबर 2018 (14:16 IST)
भारतीय संघाचा उपकर्णधार रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. रोहित शर्माची पत्नी रितिकाने रात्री उशिराने गोंडस अशा मुलीला जन्म दिला. या वृत्ताला दुजोरा रितिका शर्माची चुलत बहीण आणि दिग्दर्शक सोहेल खानची पत्नी सीमा खानने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवरून दिली आहे. दरम्यान, रोहित आणि रितिकाचे लग्न १३ डिसेंबर २०१५ रोजी झाले होते.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्टला 50 अब्जचा झटका बसणार