परत एकदा क्रिकेट विश्वाला धक्का बसला आहे. भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता, आपल्या खेळाडूंचे स्वप्न सत्यात उतरले. त्यामुळेच त्यांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहत होते. भारतीयांनी तर रात्रभर हा विजय साजरा केला होता, आता या विश्वचषकातील पाच सामने फिक्स असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका आंतरराष्ट्रीय वृत्तवाहिनीने 54 मिनिटांची एक डॉक्यूमेंट्री बनवली असून, भारतामध्ये झालेल्या तीन सामन्यांमध्ये स्पॉट फिक्संग झाल्याचे या डॉक्यूमेंट्रीमध्ये उलगडून सांगण्यात आले.
'क्रिकेट के मैच फिक्सर्स: द मुनवर फाइल्स' असे या डॉक्यूमेंट्रीचे नाव असून, 2011 साली झालेल्या विश्वचषकातील पाच तर 2012 सालच्या झालेल्या ट्वेन्टी-20 विश्वचषकातील तीन सामन्यांमध्ये फिक्सिंग झाल्याचा आरोप केला आहे. आयसीसीच्या रडारवर मुनवर नावाचा एक मॅच फिक्सर आहे. या मुनवरने 2011 साली लॉर्ड्सवर झालेल्या कसोटी सामन्यात फिक्संग झाल्याचे सांगितले आहे. या मुनवरबरोबर विराट आणि रोहित यांचे संबंध असल्याचेही पुढे आले आहे.स्पॉट आणि मॅच फिक्संगचे आरोप झाल्यावर क्रिकेट विश्व ढवळून निघाले आहे. आयसीसीनेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यामुळे आयसीसीचे भ्रष्टाचारविरोधी पथक आता या प्रकरणाची चौकशी करणार आहे. त्यामुळे आता कोणते सत्य बाहेर येते आणि नेमके कुणी किती पैसे घेतले, दाऊद अजूनही सक्रीय आहे का असे अनेक प्रश्न पुढे येत आहेत. यापुर्वी देखील असे आरोप झाले आणि अनेक खेळाडूंचे करीअर संपले आहे.