धोनी राजकीय अतिथी, वाद वाढला...

टीम इंडियाचे माजी कर्णधार महेन्द्र सिंह धोनी आपल्या कुटुंबासह शिमलामध्ये सुट्या घालवत आहे. त्यासोबत पत्नी साक्षी आणि मुलगी जीवा शिमला पोहचले. त्यांच्या हिमाचल प्रदेशाच्या दौऱ्यावर मात्र वाद सुरू झाला आहे.  
 
हिमाचल प्रदेश सरकारने महेन्द्र सिंह धोनीला राजकीय अतिथी म्हणून स्वागत केले आहे. धोनी पाच दिवस शिमला येथे राहणार आणि त्याच्या पूर्ण खर्च राज्य सरकार उचलणार. धोनीला राजकीय अतिथी बनवल्यामुळे प्रश्न उचलण्यात येत आहे.
 
सांगितल्याप्रमाणे येथे धोनी खासगी कंपनीच्या शूटसाठी आला आहे. अशात विपक्षी पक्षांचा प्रश्न आहे की धोनी खासगी कंपनीसाठी शूट करणार तर त्याचा खर्च राज्य सरकारने का म्हणून उचलायला हवा?
 
हिमाचल प्रदेश काँग्रेस अध्यक्ष सुखविंदर सिंह सुख्खू यांनी म्हटले की धोनी एक महान क्रिकेटर आहे, परंतू त्याचा खर्च उचलणे योग्य नाही तर काय अश्या प्रकाराची सुविधा सर्व खेळाडूंना मिळायला हवी? तसेच राज्य सरकार मंत्री विपिन परमार यांनी म्हटले की धोनी येथे आल्याने पर्यटनाला चालना मिळेल.

वेबदुनिया वर वाचा

पुढील लेख न्यायाधीशांना मराठी भाषेचे ज्ञान असणे अनिवार्य