Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तरुणासाठी 85 वर्षीय आजोबांनी बेड सोडला, तीन ‍दिवसांनी निधन

तरुणासाठी 85 वर्षीय आजोबांनी बेड सोडला, तीन ‍दिवसांनी निधन
, बुधवार, 28 एप्रिल 2021 (13:48 IST)
कोरोनाची दुसरी लाट अत्यंत भयावह असून ऑक्सिजन, बेड आणि इंजेक्शन मिळवण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. अशात नागपुरातील 85 वर्षीय वृद्धाने त्यागेचं एक वेगळं उदाहरण जगासमोर ठेवलं. 
 
नागपूरमधील नारायण भाऊराव दाभाडकर असे या 85 वर्षांच्या यौद्धाचे नाव आहे. दाभाडकर यांना काही दिवसांपूर्वी कोरोना संसर्ग झाला होता. त्यांची ऑक्सिजन लेव्हल 60 पर्यंत पोहोचली होती. मुलगी आणि जावयाने त्यांना इंदिरा गांधी शासकीय रुग्णालयात दाखल केलं. खूप प्रयत्नानंतर त्यांना बेड मिळाला होता. त्याचवेळी एक महिला आपल्या 40 वर्षीय पतीसाठी बेड शोधत होती. मात्र बेडअभावी रुग्णालयाने त्यांना दाखल करण्यास असमर्थता दर्शवली. बेड मिळत नसल्याने ती महिला रडत असल्याचे दाभाडकर यांनी पाहिले होते. रडणाऱ्या महिलेला पाहून दाभाडकरांनी त्यांना आपला बेड देण्याचा निर्णय घेतला.
 
रुग्णालय प्रशासनाने दाभाडकर यांच्याकडून स्वइच्छेने बेड देत असल्याचे लिहून घेतले. त्यांनतर दाभाडकर यांना घरी आणण्यात आले. घरी तीन दिवसानंतरच त्यांचे निधन झाले. 
 
बेड स्वेच्छेने सोडत असल्याचं पत्र
“मी 85 वर्षांचा झालोय, आयुष्याचा भरभरुन उपभोग घेतला, जर त्या महिलेच्या पतीचे निधन झाले, तर तिची मुलं अनाथ होतील. त्यामुळे त्या व्यक्तीचे प्राण वाचवणे हे माझे कर्तव्य आहे. मी माझा बेड स्वेच्छेने दुसऱ्या रुग्णासाठी सोडत आहे”, असे पत्र त्यांनी रुग्णालय प्रशासनाला दिले.
 
नारायण दाभाडकर हे आरएसएसचे स्वयंसेवक होते. मध्यप्रदेशाचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी ट्विटरवर दाभाडकर यांच्या त्यागाचे कौतुक केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काकूचा कोरोनाने मृत्यू