Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Sunday, 20 April 2025
webdunia

चंद्रात साईबाबांची प्रतिमा, व्हॉट्सअॅपवर जोरदार अफवा

sai baba
, मंगळवार, 25 सप्टेंबर 2018 (17:16 IST)
मुंबईमध्ये पौर्णिमेच्या दिवशी चंद्रात शिर्डीच्या साईबाबांची प्रतिमा दिसत असल्याची अफवा व्हॉट्सअॅपवर अफवा मोठ्या प्रमाणात पसरत होती. या अफवेमुळे मुंबईत अनेक ठिकाणी लोकांनी चंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती. सोमवारी चंद्रामध्ये साईबाबा दिसत असल्याचा एक फोटो व्हॉट्सअॅपवर चांगलाच व्हायरल होत होता. जो खरा भक्त असेल त्यालाच फक्त चंद्रात साईबाबा दिसतील असा मॅसेजही व्हॉट्सअॅपवर फिरत होता.
 
सोशल मीडियावरील या अफवेमुळे रात्री मुंबईकरांनी चंद्र पाहण्यासाठी गर्दी केली होती. मुंबईसह कोकणातील देखील ही अफवा पसरत होती. याआधी कर्नाटकात देखील अशी अफवा पसरली होती. जगभरात साईबाबांवर श्रद्धा ठेवणारे लाखो भक्त आहेत. त्यामुळे ही अफवा खूप झपाट्याने पसरली. याआधी 2014 मध्ये ही अशीच एक अफवा पसरली होती.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गूगल सर्च होणार आणखी सोपे