पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींवर बोचऱ्या शब्दांत राफेल विमान खरेदी व्यवहारावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी टीका केली. मोदींना 'कमांडर इन थिफ' म्हणून राहुल गांधींनी संबोधले आहे. यामुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राहुल गांधींनी एक व्हीडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हीडिओमध्ये व्यक्ती राफेल कराराची माहिती देत आहे. राफेल करारासाठी भारत सरकारने अंबानीचं नाव सूचवलं. त्यामुळे माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, असे माजी राष्ट्रपती फ्रास्वा ओलांद यांनी सांगितल्याचे हा व्यक्ती सांगत होते. या व्हीडिओला राहुल गांधींनी 'कमांडर इन थिफ बाबतचं कटू सत्य' असे कॅप्शन दिले आहे. त्यामुळे खूप मोठे काहीतरी झाले असे सांगितले आहे. गांधी यांनी फ्रास्वा ओलांद यांच्या वक्तव्यानंतर देशाचा चौकीदार चोर असल्याची टीका केली. नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांनी भारतीय लष्करावर १ लाख ३० हजार कोटींचा सर्जिकल स्ट्राईक केल्याची टीकाही राहुल यांनी केली. राफेल वाद राहुल यांना कामात आला असून कॉंग्रेस जोरदार टीका करत आहे.