Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सलमान खानला दिलासा, परदेशवारीला परवानगी

सलमान खानला दिलासा, परदेशवारीला परवानगी
, बुधवार, 18 एप्रिल 2018 (08:44 IST)

काळवीट शिकारप्रकरणात सलमान खानला जोधपूर न्यायालयाने मंगळवारी दिलासा दिला. न्यायालयाने सलमानला २५ मे ते १० जुलै या कालावधीत परदेशात जाण्याची परवानगी दिली आहे. या कालावधीत सलमान कॅनडा, नेपाळ आणि अमेरिका या तीन देशांमध्ये जाणार आहे.

जोधपूरजवळील जंगलात १९९८ साली दोन काळविटांची शिकार केल्याप्रकरणी अभिनेता सलमान खानला ५ एप्रिल रोजी जोधपूर न्यायालयाने दोषी ठरवले होते. न्यायालयाने त्याला पाच वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली असून सध्या सलमान जामिनावर बाहेर आहे. निकालानंतर त्याच्या परदेशवारीवर निर्बंध आले होते. सलमानच्या वतीने मंगळवारी जोधपूर न्यायालयात परदेशात जाण्यासाठी परवानगी मिळण्यासंदर्भात अर्ज करण्यात आला. 


Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

माहिती अधिक सुरक्षित करण्याचा फेसबुकचा प्रयत्न