Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सोशल मीडियावर रिमझिम गिरे सावन या गाण्याचं रिक्रिएशन तुफान व्हायरल

rimzim barse sawan
, सोमवार, 3 जुलै 2023 (07:23 IST)
Song Rimzim Gire Sawan सध्या सोशल मीडियावर रिमझिम गिरे सावन या गाण्याचं केलेलं रिक्रिएशन तुफान व्हायरल होतंय. एवढंच कशाला प्रसिद्ध उद्योगपती आनंद महिंद्रा यांनीही या रिक्रिएशनचं कौतुक केलंय. रिमझिमच्या मूळ गाण्यात ज्या पद्धतीने नृत्य दिग्दर्शन करण्यात आलंय, अगदी जसंच्या तसं रिक्रिएशनमध्ये नृत्य दिग्दर्शन दिसतंय. एवढंच नव्हे तर त्या काळात हे गाणं मुंबईच्या ज्या ज्या लोकेशन्सवर शूट झालं ती सर्व लोकेशन्स जशीच्या तशी दाखवण्याचाही प्रयत्न करण्यात आलाय. त्यामुळे या गाण्याची मॉर्डन फ्रेम पाहताना जुन्या गाण्याची फ्रेम आठवल्याशिवाय राहत नाही.
 
या गाण्याचं रिक्रिएशन तुफान व्हायरल झाल्यानंतर आम्ही थेट या गाण्याचे नृत्य दिग्दर्शक आणि व्हिडिओग्राफर अनुप रींगणगावकर यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी या प्रक्रियेविषयी अगदी भरभरून सांगितलं. “प्रत्येकाच्या आयुष्यात एक बकेट लिस्ट असते. या बकेट लिस्टमध्ये बऱ्याच गोष्टी असतात. कधी पूर्ण होणाऱ्या, कधी न होणाऱ्या. अशाच आमच्या एका मित्राच्या बकेट लिस्टमध्ये या गाण्यावर काहीतरी करण्याची इच्छा होती. त्याने ती इच्छा बोलून दाखवली. मग या गाण्याचं रिक्रिएशन करण्याची कल्पना सुचली. शैलेश इनामदार आणि मी इयत्ता पाचवीपासून मित्र आहोत. त्यामुळे त्याची ही बकेट लिस्ट पूर्ण व्हावी अशी माझी मनापासून इच्छा होती. अगदी सहज सुचली कल्पना आणि अगदी कमी वेळात ती पूर्ण झाली”, असं अनुप रींगणगावकर सांगत होते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अजित पवार बंड: ही गुगली नाही तर हा तर थेट दरोडा - शरद पवार