Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Thursday, 3 April 2025
webdunia

ब्रह्मांडामध्ये अंदाजापेक्षा जास्त आहेत राहण्या योग्य ग्रह

The universe
, मंगळवार, 7 ऑगस्ट 2018 (11:04 IST)
ब्रह्मांड नेहमीच शास्त्रज्ञांसाठी रहस्य आणि जिज्ञासेचा विषय राहिले आहे. जगभरातील शास्त्रज्ञ अन्य ग्रहावर जीवसृष्टीच्या शक्यता शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळेच दुसर्‍या ग्रहांवर मानवी वस्ती साकारण्याचे स्वप्न टिकून आहे. आता या दिशेने एक महत्त्वपूर्ण बाब समोर आली आहे. एका ताज्या अध्ययनातील दाव्यानुसार, ब्रह्मांडामध्ये आपल्या आतापर्यंतच्या अंदाजापेक्षाही जास्त ग्रहांवर जीवसृष्टीस अनुकूल परिस्थिती असू शकते. अमेरिकेतील पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीच्या भूशास्त्रज्ञांच्या माहितीनुसार, जीवनाच्या अनुकूल स्थितीसाठी दीर्घकाळपर्यंत आवश्यक समजली जाणारी टेक्टॉनिक प्रतले वास्तवात आवश्यक नाहीत. राहण्यायोग्य ग्रह वा अन्य ग्रहांवर जीवसृष्टीच्या शोधासाठी शास्त्रज्ञांनी वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइडचे घटक पारखले. या अध्ययनानुसार, पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनडाय ऑक्साइड हरितगृहे वायूंच्या माध्यमातून पृष्ठभागाचे तापमान वाढवतो. या अध्ययनासाठी ब्रँडफोर्ड फोली व पेन्सिल्वेनिया स्टेट युनिव्हर्सिटीचे साहायक प्राध्यापक अँड्र्यू स्माय यांनी अन्य ग्रहांवरील जीवनचक्रासाठी एकसंगणकीय मॉडेल तयार केले आहे. त्यात त्यांनी हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला की, या ग्रहांच्या वातावरणात किती उष्णता तयार होते व जीवनासाठी किती उष्णतेची आवश्यकता आहे. ग्रहांचा आकार व रासायनिक संरचना बदलण्याच्या शेकडो परिस्थितीआधारे टेक्सॉनिक प्रतलांच्या ग्रहांवर अब्जावधी वर्षांपासून पाणी द्रवरुपात अस्तित्वात असू शकते, या निष्कर्षांवर ते पोहोचले आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तब्बल १७ लाख कर्मचारी आजपासून ३ दिवस संपावर