स्पेशल चाइल्ड्सबद्दल आपण ऐकलं असेलच ज्यात काही मुलांना जन्मापासूनच काही व्यंग असतं. अशात अनेकदा दुर्मिळ प्रकरणं बघायला मिळतात. पण सध्या समोर आलेल्या एका प्रकरणामुळे सर्व हैराण आहेत. एका बाळाने चक्क तीन लिंगासह जन्म घेतला आहे.
इरकामधील मोसुल शहरातील दुहोकमध्ये जन्मलेल्या एका मुलाला तीन पेनिस असल्याचे कळून आले आहे. या बाळाच्या प्रायव्हेट पार्टला सूज येत होती. त्याला जन्मानच्या तीन महिन्यांनी डॉक्टरांकडे नेण्यात आलं. डॉक्टरांनी त्याची तपासणी केली तर ते देखील हैराण झाले. या बाळाला तीन लिंग होते. मुख्य लिंगाला जोडून आणखी दोन लिंग दिसून आले. त्यापैकी एक लिंग मुख्य लिंगाच्या जवळ तर तर दुसरं मुख्य लिंगाच्या खालच्या बाजूला होतं. एकाची लांबी दोन सेमी तर खालच्या लिंगाची लांबी एक सेमी होती.
इंटरनॅशनल जर्नल ऑफ सर्जरीमध्ये या प्रकरणाबाबत देण्यात आलेल्या रिपोर्टप्रमाणे याला ट्रिपहेलिया म्हटलं जातं. डॉक्टरांप्रमाणे तीन पेनिस असणं म्हणजे ट्रिपहेलियाचं हे पहिलंच प्रकरण असावं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार 2015 साली भारतातसुद्धा एका बाळाला दोन लिंग असल्याचं प्रकरणं समोर आलं होतं.
या तिन्ही लिंगापैकी फक्त एकच लिंग काम करत असून इतर दोन लिंगांमध्ये मूत्रमार्ग किंवा युरिन ट्युब नव्हती. त्यामुळे त्यातून लघवी निघत नव्हती. तपासणी केल्यानंतर अतिरिक्त दोन लिंग शस्त्रक्रिया करून काढण्यात आले.
बाळाला आनुवंशिकपणे अशी समस्या आली नसल्याचे कळल्यावर गर्भात काही समस्या झाल्याचा अंदाज लावला जात आहे.