जगप्रसिद्ध ‘टाइम’ मासिक‘ मेरेडिथ कॉर्प’ या अमेरिकी कंपनीने ‘सेल्सफोर्स’ कंपनीला 19 कोटी डॉलरमध्ये विकल आहे. यापुढे ‘सेल्सफोर्स’चे सह-संस्थापक मार्क बेनीऑफ आणि त्यांची पत्नी आता ‘टाइम’ मासिकाचे नवे मालक असणार आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, सेल्सफोर्स’च्या चार सह-संस्थापकांपैकी एक मार्क बेनीऑफ आणि त्यांच्या पत्नीने हे मासिक विकत घेतलं. सेल्सफोर्स ही ‘क्लाउड कंप्यूटिंग’ मधील दिग्गज कंपनी आहे. 190 मिलियन डॉलरमध्ये हा सौदा झाल्याचं ‘मेरेडिथ’कडून सांगण्यात आलं आहे. मात्र, पत्रकारितेशी निगडीत लिखाण आणि निर्णयांमध्ये बेनीऑफ यांचा हस्तक्षेप नसेल, त्याबाबतचे सर्व निर्णय टाइमचे सध्याचे कार्यकारी मंडळच घेईल असंही ‘मेरेडिथ’ने स्पष्ट केलं आहे.