Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोरोनाच्या चाचणीसाठी TB चं चाचणी यंत्र वापरण्यात येणार

कोरोनाच्या चाचणीसाठी TB चं चाचणी यंत्र वापरण्यात येणार
, शुक्रवार, 22 मे 2020 (07:48 IST)
ICMR ने म्हटले आहे की औषध प्रतिरोधक क्षयरोगाची चाचणीसाठी वापरण्यात येणारं यंत्र आता कोव्हिड-19 ची तपासणीसाठी वापरलं जाऊ शकतं. 
 
कोरोना विषाणूच्या संसर्गाची तपासणी क्षमता वेगाने वाढविण्याच्या प्रयत्नातचा एक भाग म्हणून ICMR ने 10 एप्रिल रोजी ट्र्यूनेट सिस्टमचा वापर करण्याची परवानगी दिली होती. आता ICMR ने कोविड 19 च्या तपासणीसाठी ट्र्यूनेट सिस्टमसाठी अद्ययावत निर्दर्शक तत्व जारी केले आहेत. ज्यात म्हटले आहे की ट्र्यूनेट सिस्टम आता कोवीड-19 च्या प्रकरणाची तपासणी आणि पुष्टीसाठी एक व्यापक कसोटी आहे. 
 
मार्गदर्शक सूचनांनुसार कोवीड -19 चे सर्व संशयित नमुन्यांची प्रथम ‘ई जीन स्क्रीनिंग एस्से’ ने चाचणी. त्यामधील निगेटिव्ह परिणामांना निगेटिव्ह मानले पाहिजे. संसर्ग लागल्याचे आढळून आलेले सर्व नमुने संक्रमणाच्या पुन्हा पुष्ठीकरणासाठी दुसऱ्या टप्प्यातून त्यांची चाचणी केली पाहिजे.
 
दुसरा टप्पा ‘आरडीआरपी जीन कंफेटरी एस्से’ आहे. या प्रक्रियेत ज्यांना संसर्ग असल्याची पुष्टी झालेली आहे त्यांना संक्रमित मानायला हवं. मार्गदर्शकसुचनेनुसार निर्बंधाच्या दुसऱ्या टप्प्यात ज्या नमुन्यांमध्ये संसर्गाची पुष्टी झालेली आहे त्यांना RTPCR आधारित पुष्टीकरण चाचण्या आवश्यक नाही.
 
यात म्हटले आहे की ICMR च्या पोर्टलवर संक्रमण झालेल्या सर्व प्रकरणाची नोंदणी करायला हवी. तसेच ज्यांच्यात संसर्ग आढळला नाही त्यांचा विषयी देखील माहिती द्यायला हवी. 
 
उल्लेखनीय आहे की कोविड 19 मुळे देशभरात 3,303 लोकांचा मृत्यू झाला आहे. आणि संसर्गाचे प्रमाण वाढून 1,06,750 वर पोहचले आहे. 
 
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की गेल्या 24 तासात 140 संसर्गाने लोकांचा मृत्यू झाला आहे आणि संसर्ग होण्याची  5,611 नवीन प्रकरणं नोंदण्यात आले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

कोरोनाची नवी लक्षणे, हाताला वेदना, झिणझिण्या येतात