Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Uddhav Thackeray full Information : उद्धव ठाकरे यांची संपूर्ण माहिती

Uddhav Thackeray full Information : उद्धव ठाकरे यांची संपूर्ण माहिती
, बुधवार, 29 मार्च 2023 (13:57 IST)
शिवसेना कोणाची हा वाद सुरु झाला त्या दिवसापासून उद्धव ठाकरे नाव चर्चेत आहे, तर मग त्यांचा राजकीय प्रवास कसा होता त्य बद्दल कुतूहल मिर्माण होते तर मग आज आपण जाणून घेणार आहोत उद्धव ठाकरे यांची संपूर्ण माहिती.
उद्धव ठाकरे हे भारतीय राजकारणी आणि महाराष्ट्राचे 19 वे माजी मुख्यमंत्री आहेत. शिवसेनेचे संस्थापक बाळ ठाकरे यांचे ते सुपुत्र आहेत.राजकारणात येण्यापूर्वी ते प्रसिद्ध लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार होते.
 
नाव उध्दव बाळासाहेब ठाकरे
जन्म 27 जुलै 1960
वडिल बाळासाहेब ठाकरे
आई मिनाताई ठाकरे
पत्नी रश्मी ठाकरे
अपत्य आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे
निवासस्थान मातोश्री, मुंबई
शिक्षण कला शाखेची पदवी, जेजे इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट, मुंबई
 
जन्म आणि सुरुवातीचे जीवन
उद्धव यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी चांद्रसेनीय कायस्थ प्रभू कुटुंबात झाला होता. ते बाळ ठाकरे आणि त्यांची पत्नी मीना ठाकरे यांचे पुत्र आहेत. उद्वव ठाकरे यांनी आपले शिक्षण बालमोहन विद्यामंदिर मधून केले. पुढे मुंबईतील सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्ट मधून पदवी मिळवली
 
उद्धव ठाकरे यांचा राजकारणात प्रवेश
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते. निवडणुकांच्या काळात शिवसेनेच्या प्रचारयंत्रणेतही त्यांचा सहभाग असे. इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली. पुढील वर्षी इ.स. २००३ साली त्यांच्याकडे शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली.
 
उद्धव ठाकरे यांची कारकीर्द
गेल्या अनेक दशकांपासून मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या उद्धव ठाकरे यांना त्यांचे वडील शिवसेनेचे संस्थापक स्व. बाळासाहेब ठाकरे, आई स्व. मीनाताई आणि आजोबा प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांचा समृद्ध वारसा लाभला आहे.
शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी पायाभरणी केलेल्या आणि शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाची धुरा उद्धव ठाकरे यांनी मुख्य संपादक म्हणून सांभाळली.
 
उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी मुंबईमध्ये झाला आहे. उद्धव ठाकरे यांनी जे. जे. स्कूल ऑफ आर्टसमधून पदवी घेतली आहे. त्यांच्या छायाचित्रांची अनेक पुस्तके प्रसिद्ध आहेत. एक सिद्धहस्त लेखक आणि व्यावसायिक छायाचित्रकार असलेल्या ठाकरे यांच्या कलाकृतींची दखल अनेक नामवंत मासिकांनी वेळोवेळी घेतली आहे. तसेच त्यांच्यातील जागतिक दर्जाच्या छायाचित्रकाराचे दर्शन विविध प्रदर्शनांच्या माध्यमातून रसिकांना घडले आहे.
 
राजकीय कारकीर्द (Uddhav Thackeray full Information)
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या राजकीय जीवनाची सुरूवात विद्यार्थी दशेपासून झाली. शिवसेनेच्या माध्यमातून सामाजिक आणि राजकीय जीवनात सक्रीय असलेल्या ठाकरे यांच्याकडे 1997 च्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी आली. त्यांनी महापालिकेवर शिवसेनेची सत्ता स्थापन करीत ती यशस्वीरीत्या पूर्ण केली. या निवडणुकीने त्यांच्यातील राजकीय नेतृत्वगुण संपूर्ण राज्याने अनुभवले. 2003 मध्ये पक्षाने त्यांच्याकडे कार्याध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर 2004 मध्ये त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून घोषित केले.
 
webdunia
व्यक्तीगत जीवन
उद्धव ठाकरे यांचा विवाह रश्मी ठाकरे यांच्याशी झाला असून त्यांना आदित्य आणि तेजस अशी दोन मुले आहेत. आदित्य ठाकरे आजोबा आणि वडिलांचा राजकारणाचा वसा पुढे चालवित आहेत. ते सध्या युवासेनाप्रमुख असून वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत.
 
कलात्मक पैलू
महाराष्ट्राच्या भौगोलिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक अशा अलौकिक सौंदर्याचे मूर्तीमंत आणि विहंगम छायाचित्रण त्यांच्या ‘महाराष्ट्र देशा’ या 2010 ला प्रकाशित झालेल्या पुस्तकातून दिसून येते. महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिकतेचा मानबिंदू असलेल्या ‘पंढरपूर वारी’चे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे यथार्थ छायाचित्रण त्यांच्या ‘पहावा विठ्ठल’ या 2011 मधील पुस्तकाच्या माध्यमातून देशालाच नव्हे तर जगाला भूरळ घातली. आपल्या छायाचित्र प्रदर्शनाच्या माध्यमातून दुष्काळी भागातील शेतकरी आणि वन्यजीव संरक्षणासाठी निधी उभारून त्यांनी मदत केली.
 
योगदान
शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर शिवसेनेला अधिक सर्वसमावेशक करतानाच आधुनिकतेशी त्यांनी शिवसेनेला जोडले. युवक, कामगार आणि शेतकरी यांच्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी राज्यभर चालविलेल्या विविध आंदोलनांना यश आले.
 
80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण या धोरणाने कार्य करणाऱ्या शिवसेनेच्या समाजकारणाची दखल गिनीज बुकने घेतली आहे.
 
ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने मलेरिया आजारासाठी चाचणी आणि उपचार केंद्र सुरू करून गरजूंसाठी औषध पुरवठाही सुरू केला.
 
मुंबईमधील आरोग्य सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने अनेक रूग्णालयांचे निर्माण.
 
विविध रक्तदान महाशिबिरांच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण समाजकार्याची पायाभरणी.
 
2002 च्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे प्रचार प्रमुख म्हणून जबाबदारी आणि विजयाचे शिल्पकार. महाराष्ट्रात पक्षविस्तार केल्याने लोकसभा, विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेला यश. गेल्या पाच वर्षांपासून राज्यातील आणि केंद्रातील सरकारांमध्ये शिवसेना एक प्रमुख घटकपक्ष म्हणून सहभागी. राज्यातील विविध स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षाला भरघोस यश.
 
राज्य आणि केंद्र शासनाकडून आवश्यक ती मदत न मिळाल्याने उद्धव ठाकरे यांनी 2007 मध्ये विदर्भातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीसाठी यशस्वी मोहीम राबवली.
 
उद्धव ठाकरे यांनी शेतकरी कल्याणावर लक्ष केंद्रीत करीत आपल्या पक्षाचा विस्तार वाढविला आणि राज्यानेही त्यांचे नेतृत्व स्वीकारले.
 
संवेदनशील लेखक, कवी, अभ्यासू आणि छायाचित्रकार असलेल्या उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या राजकारणामध्ये महत्त्वाचे बदल घडवून आणले आणि पक्षाला आजचे सुसंघटित रुप दिले.
 
Edited By - Ratnadeep ranshoor 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गिरीश बापट यांचं निधन, नगरसेवक ते खासदारकीपर्यंत असा होता प्रवास