Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गिरीश बापट यांचं निधन, नगरसेवक ते खासदारकीपर्यंत असा होता प्रवास

गिरीश बापट यांचं निधन, नगरसेवक ते खासदारकीपर्यंत असा होता प्रवास
, बुधवार, 29 मार्च 2023 (13:32 IST)
facebook
भाजप नेते, खासदार गिरीश बापट यांचं निधन आज (29 मार्च) पुण्यात निधन झालं आहे. ते 73 वर्षांचे होते.
गिरीश बापट यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आलं होतं. ते लाईफ सपोर्ट सिस्टिमवरच होते. गिरीश बापट यांचं जाणं हा भाजपच्या पुणे आणि राज्यातील कार्यकर्त्यांसाठी धक्का असल्याचं सांगत भाजपचे पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
 
जगदीश मुळीक यांनी म्हटलं की, जवळपास एक ते दीड वर्षं त्यांची प्रकृती ठीक नव्हती. ते उपचार घेत होते. त्यांनी अतिशय धाडसाने आजारपणाशी झुंज दिली.
 
गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे
 
गिरीश बापट यांचा राजकीय प्रवास
गिरीश बापट यांनी नगरसेवक म्हणून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली.
 
नगरसेवक ते खासदार असा जवळपास चाळीस वर्षांचा त्यांचा प्रवास होता.
1983 पासून राजकारणात सक्रीय असलेले गिरीश बापट तीन वेळा नगरसेवक, पाच वेळा आमदार राहिले आहेत.
 
2014 साली देवेंद्र फडणवीसांच्या सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली होती.
 
2019 च्या निवडणुकीत बापट खासदार म्हणून निवडून आले.
 
Published By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Badminton: सात वर्षांनंतर पीव्ही सिंधू BWF च्या टॉप 10 मधून बाहेर