जगभरात अनेक देश असे आहेत जिथे विचित्र नियम कायदे पाळले जातात. एक आफ्रिकन देश स्वाजीलँड, येथील विचित्र कायदा जाणून आपण हैराण व्हाल.
मागील वर्षी येथील राजा मस्वाती तृतीयाने देशाचे नाव बदलून 'द किंगडम ऑफ इस्वातिनी' असे ठेवले होते. देशाच्या स्वातंत्र्याला 50 वर्ष पूर्ण झाल्यावर अशी घोषणा करण्यात आली होती.
या देशात प्रत्येक वर्षी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यात महाराणीच्या आईच्या शाही गाव लुदजिजिनी येथे 'उम्हलांगा सेरेमनी' फेस्टिव्हल साजरा केला जातो, ज्यात 10 हजाराहून अधिक अविवाहित महिला आणि मुली सामील होतात.
या समारंभात राजासमोर अविवाहित मुली नृत्य करतात. या मुलींमधूनच राजा आपल्यासाठी नवीन राणीची निवड करतो. यात हैराण करणार्यासारखी बाब म्हणजे मुली नागड्या राजा आणि प्रजेसमोर नृत्य करतात.
येथील बुजुर्ग स्त्रिया मुलींना लग्न होयपर्यंत व्हर्जिनिटी सांभाळण्याची आणि आपलं शरीर सुंदर ठेवण्याचा सल्ला देतात. आपल्या परंपरेबद्दल जाणीव असावी म्हणून या उत्सवामध्ये सामील होण्याचे महत्त्व असतं.
तसेच येथे लग्नापूर्वी मुली गर्भवती झाल्यास कुटुंबाला दंड भोगावा लागतो. शिक्षा म्हणून त्यांना लोकांना गाय द्यावी लागते.
या देशाच्या राजाचे 14 विवाह झाले आहेत, त्याद्वारे, राजाला 25 मुले आहेत.
एका रिर्पोटप्रमाणे अलीकडेच राजाने आदेश काढला आहे की येथील लोकांनी किमान दोन तरी विवाह करावे नाहीतर त्यांना तुरुंगात टाकले जाईल. तरी राजाने ही बातमी नाकारली आहे, असे कुठलेही आदेश काढण्यात आलेले नाही, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.