Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

संबंध बनवताना या माणसाने केले असे काही की आता भोगावी लागेल 12 वर्षाची कोठडी

संबंध बनवताना या माणसाने केले असे काही की आता भोगावी लागेल 12 वर्षाची कोठडी
ब्रिटनमध्ये एक विचित्र प्रकरण समोर आले आहे. येथे एका व्यक्तीने सेक्स वर्करसोबत शारीरिक संबंध स्थापित करताना असुरक्षित संबंध बनवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे कोर्टाने त्याला दोषी करार देत 12 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे.
 
येथील 35 वर्षीय ली हॉगबेन नावाच्या व्यक्तीने पीडिता आक्षेप घेत असून देखील तिच्यासोबत असुरक्षित शारीरिक संबंध बनवले, जेव्हाकी कंडोम वापरायचे आधीच ठरले होते. असे न केल्यामुळे त्याने पीडिताची अट मान्य केली नाही ज्यामुळे पीडिताने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 
 
ली ने दुष्कर्माचा आरोप नकाराला असला तरी ट्रायलनंतर त्याला दोषी ठरवले गेले. पीडिता पोलिसात तक्रार नोंदवण्यासाठी पोहचली तर आरोपीने तिच्या आजी-आजोबांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्याने एका मेसेजमध्ये लिहिले की माझ्यासोबत असे केल्यामुळे मी तुझं डोकं फोडेन आणि तुझ्या आजी-आजोबांचा जीव घेईल.
 
त्यानंतर देखील ट्रायल कोर्टात दोषी ठरवून त्याला शिक्षा सुनावली गेली तर त्याने व्हिडिओ जारी करत जजला गोळी मारण्याची धमकी दिली. त्याने त्यात म्हटले की मी येत आहे, मी तुला रात्रीच गोळी मारून ठार करेन.
 
सुनावणी दरम्यान कोर्टाला कळले की महिलेने एका साईटवर जाहिरात दिली होती आणि त्यात अटींचा उल्लेख केला गेला होता. सुरक्षेबद्दल स्पष्ट उल्लेख करण्यात आला होता. या जाहिरातीद्वारे ली ने त्या मुलीशी संपर्क केला आणि 19 जानेवारी रोजी एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरवले. नंतर संबंध बनवताना त्याने सुरक्षा न राखल्यामुळे मुलीने विरोध केला तरी त्याने संबंध स्थापित केले.
 
तिने विरोध केल्यावर त्याने धमक्या दिल्या. तिने दूर जाण्याचा प्रयत्न केला तर त्याने स्वत:बद्दल सांगितले की मी लोकांशी मारहाण करतो आणि लोकांना लुटतो. दोन तास त्या मुलीसोबत घालवून त्याने पेमेंट देखील केले नाही. त्यावर आधीदेखील आरोप लागलेले आहेत. या व्यतिरिक्त त्यावर संपत्ती नष्ट करणे, खाजगी फोटो लीक करणे, कोर्टाचे निर्देश न पाळणे आणि पीडितासोबत अपमानजनक व्यवहार करण्याचे आरोप आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाराणसी : नरेंद्र मोदींविरोधात प्रियंका गांधींनी निवडणूक का लढवली नाही?