Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माकडांचा Valentine’s Day

webdunia
शनिवार, 13 फेब्रुवारी 2021 (12:45 IST)
लंडन- जगभरात व्हॅलेंटाईन डे ची धूम असून प्राण्यांनीही हा दिवस प्रेमाने साजरा करावा यासाठी लंडनमधील जू मध्ये विशेष तयारी केली गेली आहे. येथष ZSL या प्राणीसंग्रहालयात स्क्विरल मंकी या कुटुंबातील सात सदस्यांना व्हॅलेंटाईन डे स्पेशल फूड पॅकेट्स देण्यात आले आहे. माकडांच्या या प्रेमाच्या दिवस साजरा करण्याची पद्धत व्हायरल होत आहे.
 
येथील जू मधील नऊ वर्षांचा नुका आणि त्याच्या सर्व बोलिव्हियन ब्लॅक-कॅप्ड स्क्विरल माकडांना हार्ट शेप थीम असलेल्या पिशव्यामधून जेवण देण्यात आलं.  व्हॅलेंटाईन डे या निमित्ताने त्यांना जेवणासाठी त्यांच्या आवडीचे वॉर्म्स देण्यात आले होते.
 
व्हॅलेंटाईन साजरा करण्यासाठी या थीमची निवड करताना प्रत्येकासाठी वेगवेगळी जेवणाची पिवशी देण्यात येत आहे ज्याने त्या आकर्षक बॅगसाठी त्यांच्यात भांडण होऊ नये.
 
कोरोना व्हायरसमुळे सध्या लंडनमधील हे ZSL प्राणीसंग्रहालय बंद आहे. तसंच यामुळे प्राणीसंग्रहालयावर आर्थिक दबाव निर्माण झाल्याचं दिसून येत आहे. यासाठी व्हिप्सनाडे जू संचालित करणार्‍या आंतरराष्ट्रीय संवर्धन चॅरिटीला जू कार्यरत राहावे यासाठी शक्य तितकी देणगी देण्याचं आवाहनही केलं जात आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

IRCTCची नवीन सेवा: आता तुम्हाला रीफंडाची प्रतीक्षा करावी लागणार नाही तसेच रेल्वेची तिकिटे काही मिनिटांतच बुक केली जातील, जाणून घ्या कसे?