Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

काय सांगता! लेकीसह आई, सासू, आजीही प्रेग्नंट, संपूर्ण प्रकरण जाणून घ्या

webdunia
, शनिवार, 18 मार्च 2023 (14:17 IST)
आजच्या काळात सोशल मीडियावर एखादी अनोखी गोष्ट पोस्ट केली तर ती व्हायरल होते. सध्या फोटोशुटचं प्रचंड वेड लागले आहे. लोक त्यांची सामग्री व्हायरल करण्यासाठी अनेक मजेदार आणि अनोख्या कल्पना घेऊन येतात. मॅटर्निटी  फोटोशूट खूप भावनिक असतात आणि खूप आठवणी जतन करतात. पण आज आपण ज्या जोडप्याबद्दल बोलत आहोत, त्यांनी त्यांच्या मॅटर्निटी फोटोशूटला एका खास पद्धतीने खास बनवले आहे. नेटकऱ्याचे त्यांनी लक्ष वेधून आता हे फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

सध्या सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटो मध्ये तीन पिढीच्या दिसत आहे आणि मुख्य म्हणजे फोटो मध्ये लेकीसह आई, सासू, आणि आजी या सगळ्या प्रेग्नेंट आहे. हे सत्य नसून फोटो शूट आहे. या मध्ये मुलीसह तिची आई, सासू आणि 80 वर्षाची आजी देखील प्रेग्नेंट असल्याचे दाखवले आहे. 
 
काय आहे हे प्रकरण -
मातृत्व हे फारच सुखद अनुभव आहे. घरात बाळ येणार ही कल्पनाच सुखावून जाते. घरातील प्रत्येक जण बाळाच्या स्वागतासाठी सज्ज असतात. व्यवसायाने फोटोग्राफर असलेल्या जिबिन जॉयने आपल्या पत्नीसाठी मॅटर्निटी फोटोशूट केले. त्यासाठी तो अनेक कल्पना शोधत होता. त्याची नऊ महिन्यांची गरोदर पत्नी चिंचू पीएस हिच्या नऊ महिन्यांत फोटोशूट करण्याची त्याला चांगली कल्पना सुचली. रोमचम या चित्रपटाच्या का गाण्यातून त्यांना ही कल्पना सुचली. या गाण्याने प्रेरित होऊन जिबिनने फोटोशूटमध्ये आजी-आजोबा, आई-वडील आणि पत्नीच्या आई-वडिलांचा समावेश करण्याचा निर्णय घेतला. कुटुंबातील सदस्यांनीही या कल्पनेचा भाग होण्यास सहमती दर्शवली आणि त्याचे फोटो शेअर होताच ते व्हायरल झाले.
गर्भवती जिबिनने हे फोटोशूट सर्व महिलांना दाखवले . सर्वांना शूट लोकेशनवर नेण्यात आले. यानंतर तिने सर्व पिढ्यांतील महिलांना प्रेग्नंट लुक दिला. या महिलांनी आपल्या पतीसोबत आपणही गरोदर असल्यासारखी पोज दिली. जिबीनच्या 87 वर्षांच्या आजोबांनी आपल्या 80 वर्षांच्या पत्नीच्या कपाळावर चुंबन घेतले तेव्हा त्यांच्या पत्नीने गर्भधारणा झाल्यासारखे तिचे पोट धरले. जिबीनने हीच संकल्पना आई-वडील आणि सासरच्या मंडळींसोबत स्वीकारली.
या फोटोशूटमध्ये कपलचे आई-वडीलही दिसले. त्यालाही मूल होणार असल्याच्या अनुभव घेत त्यांनी पोज दिली. प्रेम, आपुलकी आणि कृतज्ञतेने भरलेल्या या फोटोशूटला लोक पसंत करत आहेत. पतीच्या या अनोख्या फोटोशूटच्या कल्पनेने जिबिनची पत्नी खूपच खूश आहे. त्याने हे फोटोशूट आपल्या तीन आईसोबत केले आणि आता ते व्हायरल झाल्यानंतर त्याने सर्वांचे आभार मानले आहेत. या हटके फोटोशूटला नेटकऱ्यानी चांगलीच पसंती दिली आहे. 
 
 
Edited By- Priya Dixit 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

गोपीनाथ गड स्मारक विशेष स्मारक त्या बद्दल माहिती